nanded nanded
नांदेड

Corona Update: नांदेडकरांनी जिंकलं! जिल्ह्यात केवळ दोन रुग्णांची वाढ

आजच्या घडीला ३० रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे

सकाळ वृत्तसेवा

आजच्या घडीला ३० रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे

नांदेड: Nanded corona updates: जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती झपाट्याने कमी होत आहेत. बुधवारी प्राप्त झालेल्या एक हजार ९५० अहवालापैकी केवळ दोन अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९० हजार ७२४ एवढी झाली असून, यातील ८८ हजार ३३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ३० रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

गंभीर बाधित रुग्णांपैकी बुधवारी जिल्हाभरात एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६६१ एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये देगलूर - एक व हिंगोली - एक असे एकूण दोन बाधित आढळले. बुधवारी जिल्ह्यातील चार कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात देगलूर - एक, किनवट-एक, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण- दोन अशा एकूण चार व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
बुधवारी सायंकाळपर्यंत ३० कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - नऊ, किनवट- एक, देगलूर- एक, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण- १८, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण - एक व्यक्ती उपचार घेत आहेत.

कोरोना मीटर:
एकूण पॉझिटिव्ह : ९० हजार ७२४
एकूण कोरोनामुक्त : ८८ हजार ३३
एकुण मृत्यू : दोन हजार ६६१
बुधवारी पॉझिटिव्ह : दोन
बुधवारी कोरोनामुक्त : चार
बुधवारी मृत्यू : शुन्य
रुग्णालयात उपचार सुरु : ३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT