फोटो 
नांदेड

Video: नांदेडच्या कन्टेनमेन्ट झोनवर ‘या’ वाहनांची नजर 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव व मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता कमी कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताचा ताण पडू नये व त्यांच्या सुरक्षेसाठी मुख्यालयातील ३२ दुचाकी वाहने कोवीड पेट्रोलींगसाठी सज्ज केल्या आहेत. सायरन, पीएसी आणि माईक यंत्रणा व अंबर दिवे लावलेल्या या दुचाकी कन्टेनमेन्ट झोनमध्ये गस्त घालणार आहेत. या दुचाकीद्वारे, विभागीय आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, माझ्या सुचना नागरिकांना देण्यात येणार आहेत. अशा प्रकाराचा उपक्रम राज्यात पहिलाच असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.

नांंदेड शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता पोलिस प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात कमी मनुष्यबळावर कायदा व सुव्यवस्था बाधीत होउ दिली नाही. हे सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बळावर शक्य झाल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या दुचाकी वाहनाच्या उद्घाटन प्रसंगी देगलुर नाका परिसरात बुधवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजता सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, अभिजीत फस्के, डॉ. सिद्धेश्‍वर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, मोटार विभागाचे मंगेश पाटील, रामेश्‍वर कायंदे यांची उपस्थिती होती. 

या दुचाकीवरुन पोलिस गस्त घालणार 

कंनटेमेन्ट झोनमध्ये या दुचाकीवरुन पोलिस गस्त घालणार आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळावर हे काम होणार आहे. सायरनसह ही दुचाकी त्या भागातील नागरिकांना लॉकडाउनचे नियम व घराबाहेर न पडण्याचे आवाहन करणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या आवाजाद्वारे नागरिकांना सजग करण्यात येणार आहे. तसेच ३२ वाहनातील काही वाहने शहरात रात्री व दिवसाच्या गस्त दरम्यान का करणार आहेत. 

लॉकडाउनचा चौथा टप्पा लवकरच जाहीर करण्यात येणार

माईक सिस्टिम असल्याने एका कर्मचाऱ्यांव्दारे हे वाहन जमावाला पांगवू शकणार आहे.  कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळावे. बॅरिकेट्स काढल्यामुळे लॉकडाउन संपले नाही. लॉकडाउनचा चौथा टप्पा लवकरच जाहीर करण्यात येणार असून कोरोना या गंभीर आजाराला नागरिकांनी सहज घेऊ नये. प्रशासनाला सहकार्य करा आम्ही आपल्यासाठी सदैव तत्पर असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

SCROLL FOR NEXT