file photo
file photo 
नांदेड

एमआयएमला नांदेडमध्ये खिंडार; युवा आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद वाजीद यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रल्हाद कांबळे

नांदेड : हैद्राबादचे पार्सल असलेल्या एमआयएम या पक्षाला आता घसरती कळा लागली असुन या पक्षातील अनेक दिग्गज नेते बाहेर पडत आहेत. त्यातच सोमवारी (ता. आठ) जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवून या पक्षाच्या युवा आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद वाजीद यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे एमआयएमला मोठे खिंडार पडले आहे.

अ‍ॅड. सय्यद वाजीद यांनी तरुणांमध्ये या पक्षाची विचारधारा रुजविण्यासाठी मोठे काम केले. त्यामुळे त्यांच्यावर मराठवाडा विभागाच्या युवा शाखेची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु हा पक्ष विचारधारेपासुन दूर गेला असुन विकास कामांऐवजी इतर बाबींमध्ये पक्षातील नेत्यांचा अधिकचा रस आहे. यासर्व बाबींचा विचार करुन त्यांनी एमआयएम पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. नांदेड शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण अहोरात्र काम करत असुन त्यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काँग्रेस पक्षात  प्रवेश करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला.

त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसची स्थिती अधिक मजबुत झाली असून एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या वेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहीनी येवनकर, माजी महापौर अ. सत्तार, उपमहापौर मसुदखान, शमीम अब्दुल्ला यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT