गुन्हा 
नांदेड

लाईट का बंद केली, असा जाब विचारत महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

शिवचरण वावळे

नांदेड : महावितरणच्या वतीने (Mahavitran Company) विज बिल न भरणाऱ्यास समज देऊन वीजबील भरण्यास सांगितले जात आहे. इतके करुन देखील वीजबील न भरणाऱ्या ग्राहकाचे विज कनेक्शन (Electricity) कापले जात आहे. मंगळवारी (ता.२४) अशाच प्रकारची सिडकोत कारवाई करण्यात आली. दरम्यान संभाजीनगर सिडको (Nanded) येथील एका ग्राहकाने माझी लाईट का बंद केली, असा जाब विचारत महावितरणचे कर्मचारी जनमित्र आकाश दिलीपराव टोमके यांना मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ महाजन जोंधळे यांनी अनेक महिन्यांपासून लाईट बिज थकवले होते.

वीजबील वसूली मोहीम सिडको परिसरात राबवत असताना अनेक वेळा वीजबील भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. असे असतानाही गेल्या सहा महिन्यापासून एकही रूपया वीजबिल न भरल्यामुळे संभाजीनगर परिसरातील थकबाकीदार वीजग्राहक काशिनाथ महाजन जोंधळे यांचा वीजपुरवठा पोलवरून कट करण्यात आला. जनमित्र आकाश टोमके पोलवरून उतरताच त्यांना माझी लाईट का कट केली असा प्रश्न करत जोंधळे यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची जनमित्र आकाश टोमके यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT