Devendra Fadanvis esakal
नांदेड

बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील - देवेंद्र फडणवीस

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत.

अनिल कदम

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मैदानात उतरले आहेत. यावेळी फडणवीस यांनी कुंडलवाडी (ता.बिलोली) प्रचारसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहे. सामान्य माणसाची अवस्था वाईटच आहे. अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं. पण या सरकारने रुपयांची मदत (Deglur Bypoll) केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे सरकारला मिळत नाहीत. पीकविम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केलीय. या सभेला केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकरराव भालेराव, खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.गोपीचंद पडळकर, भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आ.तुषार राठोड, माजी आ.गंगाराम ठक्करवाड, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे, कुंडलवाडीचे डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार, अशोक नेमानीवार, रवींद्र पोतगंटीवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आली नसती तर बरं झालं असतं. मात्र, ही निवडणूक आल्यावर या माध्यमातून इथल्या मतदारांना एक संधी मिळालीय. राज्य सरकारच्या कामावर नापसंती व्यक्त करण्याची ही संधी मिळतेय. या सरकारने दोन वर्षांत राज्यात केवळ भष्ट्राचार केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरं दिली. गॅस सिलिंडर मिळालं पाहिजे. पण या सरकारनं गरिबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे. आयकर खात्याच्या घाडीत हजारो कोटी सापडले आहेत. ते जमा करताना सगळा हिशेबही ठेवलाय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

सगळा हिशेब ठेवलाय

प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरं दिली. गॅस सिलिंडर मिळालं पाहिजे. पण या सरकारनं गरीबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे. आयकर खात्याच्या गाडीत हजारो कोटी सापडले आहेत. ते जमा करताना सगळा हिशेबही ठेवलाय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT