file photo 
नांदेड

मतदारसंख्या कमी आसल्यामुळे प्रत्येक मतदार लाखमोलाचा; नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणूक

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : नांदेड जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी मतदारांशी संपर्क मोहीम सुरु केली आहे. अर्धापूर तालुक्यातून सेवा सहकारी सोसायटीच्या मतदार संघातून एक संचालक निवडून देण्यात येणार. या एका जागेसाठी चार उमेदवारांचे अर्ज  वैध ठरले आहेत. या चारही उमेदवारांनी मी उमेदवारी अर्ज भरला आहे, जरा लक्ष असू द्या असे म्हणत मतदारांना साद घालत आहेत. तर या मतदार संघात 24 मतदार असल्यामुळे प्रत्येक मतदार हा 'लाखमोलाचा' झाला आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा एकेकाळी राज्यभर नावलौकिक होता. पद्मश्री कै. श्यामराव कदम यांनी बॅंकेला सहकार क्षेत्रात नाव मिळून दिले. पण गेल्या पंधरा ते विस वर्षांत बॅंकेची परिस्थिती बिकट झाली आहे. या बॅंकेवर आर्थिक निर्बंध लागल्यानंतर बॅंकेचा व्यवहार सुरळीत होण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भरिव अशी आर्थिक मदत राज्य शासनाच्या माध्यमातून केली होती.

या बॅंकेची सध्या निवडणुक प्रक्रिया सुरु असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची ता. 23 मार्च आहे. अर्धापूर तालुक्यातून सेवा सहकारी सोसायटीच्या मतदार संघातून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार बाजार समितीचे माजी सभापती बाबुराव कदम कोंढेकर, भाऊरावचे संचालक प्रवीण देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे नेते माजी उपसभापती डाॅ लक्ष्मण इंगोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजेश्वर मुळे यांनी अर्ज दाखल केला. तर लक्ष्मण देबगुंडे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे.

उमेदवारांनी मतदारांशी संपर्क मोहीम सुरु केली आहे. कोणी दुरध्वनीव्दारे तर कोणी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत आहेत. निवडणूक कोणती आसली तरी मतदारांना चांगलाच भाव येतो. या निवडणुकीत प्रत्येक मत व मतदार लाखमोलाचा झाला आहे. भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, भोकर, मुदखेड या तीन तालुक्यातील उमेदवार निवडीचे अधिकार पालकमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले तरी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच श्री. चव्हाण नांदेडला आल्यावर पुढील आठवड्यात उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT