file photo 
नांदेड

दक्षिण भारतातील प्रसिध्द माळेगाव यात्रा अखेर रद्द, देवसवारी निघणार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी, दक्षीण भारतातील प्रसिध्द माळेगाव यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आल्याचे आयोजक असलेल्या जिल्हा परिषदेने कळविले आहे. केवळ देवसवारी व तेथून चार दिवस भरणाऱ्या यात्रेत देवसवारीशिवाय कुठलेच कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

माळेगाव (ता. लोहा) ची जत्रा म्हणजे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळ्याची मांदीयाळी मानली जाते. यंदा ता. ११ जानेवारीपासून ही यात्रा भरणार असली तरी, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा होणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला होता. तसे पाहिले तर माळेगावच्या यात्रेचे शासकीय नियोजन महिन्याभरापूर्वीपासून सुरु केले जाते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडून स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशू प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. नियोजनाची ह प्रक्रियाच चर्चेचा विषय बनत असते. यात्रा तोंडावर आली तरी यंदा यात्रेसंदर्भात कुठलीच चर्चा होताना दिसून आली नाही. त्यामुळे कोरोना साथ आणि ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता या वेळची यात्रा होणार की नाही? अशी विचारणा ग्रामीण भागातून होऊ लागली. कारण ग्रामीण भागाचे अर्थकारण या यात्रेवर अवलंबून असते. जनावरांचा खरेदी-विक्री शेतकरी वर्ग या यात्रेच्या माध्यमातून करत असतो. कोट्यावधींची उलाढाल होणाऱ्या या यात्रेत घोडे, उंट, गाढव, बैल, गाय, म्हैस, कुत्रे आदींची खरेदी विक्री होते.

दरम्यान, जिल्हा परिषदेने यंदाच्या यात्रेबाबत पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केवळ धार्मिक कार्यक्रम या यात्रेत होणार आहेत. ता. ११ जानेवारी रोजी श्री खंडेरायाची देवसवारी पालखी सोहळा परंपरेनुसार होणार आहे. पशु, कृषी प्रदर्शन, बचत गटाचे स्टॉल लावले जाणार नसून, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार नाही, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी स्पष्ट केले आहे. या शिवाय चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले निर्बंध पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT