अशोक चव्हाण 
नांदेड

नांदेडहून मुंबईसह जळगाव, अहमदाबादला विमानसेवा; अशोक चव्हाणांच्या प्रयत्नांना यश 

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विमानांच्या फेऱ्यांमध्ये एका बाजूला कपात सुरु असताना नांदेडहून मात्र आता दररोज विमानाने मुंबईला जाता येणार आहे. या सोबतच नांदेड हवाई मार्गाने जळगाव आणि अहमदाबादला ता. दोन मार्चपासून जोडले जाईल. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नामुळे नांदेडला नव्याने ही विमानसेवा सुरु होणार आहे.

नांदेड येथे उत्तम दर्जाचे श्री गुरूगोविंदसिंगजी विमानतळ असून या विमानतळावर नाईट लँडीगची सुविधा उपलब्ध आहे. येथील गुरुद्वारामुळे जगभरातील भाविक मोठ्या प्रमाणात नांदेडला येत असतात. यापूर्वी नांदेडहून मुंबई, हैदराबाद, नागपूर, दिल्ली आदी ठिकाणी विमानसेवा सुरु होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीकाळ विमानसेवा पूर्णतः खंडीत केल्यानंतर ट्रु जेट या कंपनीने हैदराबाद - नांदेड - मुंबई आणि मुंबई - नांदेड - हैदराबाद ही परतीची सेवा असलेली मंगळवार, बुधवार, गुरुवार या आठवड्यातील तीन दिवसांसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली.

जळगाव, अहमदाबादलाही विमानसेवा
नांदेडमधील हवाई प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून मुंबईला जाण्यासाठी दररोज विमान असले पाहिजे अशी भूमिका पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली. त्यांच्याच पुढाकारातून आता आठवड्यातील उर्वरित चार दिवस म्हणजेच सोमवार, शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशीही नांदेडकरांना विमानाने मुंबईला जाता येणार आहे. चार दिवस नव्याने सुरु होणाऱ्या या विमानाने नांदेडच्या प्रवाशांना जळगाव आणि अहमदाबाद असाही प्रवास करता येणार असल्याची माहिती ट्रु जेटचे अहमदाबाद येथील दक्षिण विभागाचे व्यवस्थापक निमेश जोशी यांनी दिली.

नांदेडहून दररोज मुंबईला जाता येणार
या पूर्वी सुरु असलेली ट्रु जेटची आठवड्यातील तीन दिवसांची विमानसेवा तशीच राहणार असून उर्वरित चार दिवसात ट्रु जेटचे विमान सकाळी पावणेदहा वाजता अहमदाबादहून निघून जळगावला अकरा वाजता पोहोंचणार आहे. साडेअकरा वाजता जळगावहून निघून हे विमान पावणे एक वाजता मुंबईला पोहोचेल. मुंबईहून एक वाजून २५ मिनिटाला निघणारे हे विमान नांदेड येथे तीन वाजता येईल. नांदेड येथून साडेतीन वाजता हे विमान मुंबईकडे रवाना होईल. मुंबई विमानतळावर पाच वाजता पोहोंचून साडेपाच वाजता जळगावांकडे उड्डाण करेल. त्यानंतर सात वाजून पाच मिनिटांनी जळगावहून निघून रात्री आठ वाजून २५ मिनिटाला अहमदाबाद येथे विमान पोहोंचेल. या नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेमुळे दररोज मुंबईला जाण्यासाठी सेवा उपलब्ध होणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून ही विमानसेवा सुरु होणार असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT