file photo 
नांदेड

देशी-विदेशीसह गावठी दारु अवैधविक्रीचा महापूर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेतंर्गत लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावा यासाठी शासनाने जिल्ह्यातील सर्व प्रकारचे मद्य विक्री दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी जिल्ह्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी तसेच देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रकरणी  पोलिसांनी छापा टाकून पाच ठिकाणी कारवाई केली आहे.

छूप्या मार्गाने दारु विकण्याचा सपाटा
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शसनाने लागू केलेल्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री दुकान मागील सव्वा महिन्यापासुन बंद आहेत. परिणामी अवैध दारु विक्री करणाऱ्यांनी छूप्या मार्गाने दारु विकण्याचा सपाटा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापामारी करुन दारु जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (ता. सात) नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाजेगाव ते वडगाव रोडवर सकाळी सव्वा अकरा वाजता चार हजार दोनशे रुपयाची गावठी दारू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगुन आल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस नाईक प्रमोद कऱ्हाळे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विदेशी दारु जप्त 
हदगाव पोलिस ठाण्यांतर्गत हदगाव रोडवर सुमित हॉटेलच्या बाजुला सहा हजार तीनशे रुपयांची विनापरवाना विदेशी दारू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे आढळून आले. या प्रकरणी फौजदार विक्रम पांडुरंग विठूबोने यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळाकोळी पोलिस ठाणे अंतर्गत माळाकोळी ते रोडवर देवला फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बेकायदेशीररित्या १८ हजार पाचशे रुपयांची गावठी दारू मिळून आली. या प्रकरणी पोलिस जमादार राम राठोड यांच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रत्नाळी शिवारात सिंदी पकडली 
धर्माबाद पोलीस ठाण्यांतर्गत रत्नाळी शिवारात शिवरस्त्यावर बेकायदेशीररित्या एक हजार ४४० रुपयांची शिंदी चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगुन आल्याचे आढळून आले. या प्रकरणी जमादार रावसाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्माबाद पोलीस ठाण्यांतर्गतच रत्नाळी शिवारात तीन हजार ६७५ रुपयाची विदेशी दारु अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आले. या प्रकरणी नेताजी बोरगे यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८५ हजाराच्या जनावरांची चोरी
मुदखेड तालुक्यातील निवघा शिवारात पार्डी रोडवर असलेल्या आखाड्यावरुन दोन म्हसी, एक गाय व एक रेडा असे ५ हजाराच्या जनावरांची चोरी झाल्याची घटना बुधवारी (ता. सहा) मध्यरात्री घडली. या प्रकरणी चंपत शंकरराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बारड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस जमादार श्री किडे करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT