कुंभदीपस्तंभ ग्रुपचा आधार 
नांदेड

विधायक बातमी : 'कुंभदीपस्तंभ'ची कुंभार समाजातील गरजू, वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत

कुंभार समाजामध्ये अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. बर्‍याच विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे मधूनच अर्धवट शिक्षण सोडावे लागते. सध्या जागतिक कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे विद्यार्थ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

बंडू माटाळकर

निवघाबाजार ( ता. हदगाव, जिल्हा नांदेड ) : कुंभार समाजासह सर्वच समाजातील मुल अभ्यासात हुशार असतात. परंतु त्यातील काहींची आर्थीक परिस्थिती नाजूक असते. त्यामुळे या मुलांना अर्धवट शिक्षण सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी पालकांच्या व्यवसायात किंवा मजुरीने जावे लागते. इच्छा असूनही त्यांना शिक्षण घेता नाही. अशा होतकरु व गरीब आणि वंचित कुंभार समाजातील मुलांना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी 'कुंभदीपस्तंभ' हा व्हाटसअप ग्रुप पुढे आला. या ग्रुपच्या माध्यामातून अनेक विद्यार्थ्यांना आर्थीक मदत मिळत असून शिक्षणापासून दूर गेलेले विद्यार्थी आता शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत.

कुंभार समाजामध्ये अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत. बर्‍याच विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे मधूनच अर्धवट शिक्षण सोडावे लागते. सध्या जागतिक कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे विद्यार्थ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आॅनलाईनचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मोबाईल रिचार्ज साठीही काही पालकांकडे पैसे नसतात. अशाच एका खडतर प्रवासाचा सामना करीत असलेल्या ग्रामीण भागातील निवघाबाजार येथुन तिनं किलोमीटर अंतरावर असलेल्या हस्तरा ता. हदगांव येथील बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या आर्यन अमोल उचाडे याला करावा लागला. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीच्या असल्याने शिक्षणासाठी अडचणी येत होत्या. तो हुशार असून त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची शक्यता होती. ही माहिती कुंभदीपस्तंभ ग्रुपला कळाली असल्याने ग्रुपने आर्यनला आर्थिक मदत करुन धीर दिला.

हेही वाचा - नांदेड : आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे

यासाठी सामाजिक दायित्व स्विकारीत माहेश्वरी हार्डवेअरचे मालक अनुपजी सारडा व बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.मानसपुरे यांनीही आर्थिक योगदान दिले. आर्यनला शिक्षणासाठी मदत झाली असल्याने आणखी दानशूर व्यक्तींनी योगदान देण्याची गरज आहे.

यावेळी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे पत्रकार बंडू माटाळकर, रामेश्वर बोरकर, देविदास कल्याणकर, प्रभाकर दहीभाते, सुदर्शन कऱ्हाळे, किशन सोळंके व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष नामदेव भेणे, प्रमुख पाहुणे सुभाष तेटवार, प्रा. गजानन बनचरे, प्रा. नरसिंग पिंपरणे, आकाश बहणे, मोतीराम बमरुळे, रामचंद्र बमरुळे उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी हरिश्चंद्र चिल्लोरे, सुभाष बहणे, अविनाश बमरुळे, श्रीकांत परडे यांचे सहकार्य लाभले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ZIM : ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात? झिम्बाब्वेच्या अविश्वसनीय विजयाने 'ब' गटाचे समीकरण बदलले...

Mumbai Fire: मुंबईत लोअर परळ वर्कशॉपमध्ये आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

Valentine Week : व्हॉलिबॉलच्या मैदानावर फुललेलं प्रेम! कोच अभय आणि अंजली यांची रंजक प्रेमकहाणी; 37 वर्षांनंतरही 'रोझ डे'ने ताजा केला आठवणींचा सुगंध

Latest Marathi News Live Update : अमरावतीत नदीपात्रात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

Amravati Crime: वडिलांना मारहाण केल्याने सराईताचा खून; सहा अटकेत, एका विधिसंघर्षिताचा समावेश

SCROLL FOR NEXT