file photo 
नांदेड

गुड न्यूज : नांदेड- अमृतसर- दिल्ली विमानसेवा १९ डिसेंबरपासून, आठवड्यातून तिन दिवस

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली एअर इंडियाची विमानसेवा ही पूर्वत सुरु करण्यात आली आहे. सुरवातीला नांदेड- अमृतसर अशी सेवा सुरु केली होती. परंतु प्रवशांच्या मागणीनुसार आता ही सेवा वाढवत पुढे दिल्लीपर्यंत करण्यात आली आहे. यासाठी एअर इंडियाकडून प्रवाशी बुकींग सुरु झाली आहे. ही सेवा ता. १९ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती नांदेड स्टेशन मॅनेजर गजेंद्र गुठे यांनी सांगितली आहे. 

नांदेड ते अमृतसर, नांदेड ते दिल्ली आणि नांदेड ते चंदीगड अशी एअर इंडियाची सेवा कोरोनापूर्वी सुरु होती. मात्र देशआत कोरोनाचे थैमान पसरल्याने देशांतर्गतची विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यात वरील ह्या तीन्ही सेवा बंद होत्या. परंतु सध्या कोरोनाचे सावट कमी झाल्याने केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरु केली. त्यामुळे एअर इंडियानेही नांदेड- अमृतसर ही पुन्हा सेवा सुरु केली होती. ती आठवड्यातून तीन दिवस नियमीत सुरु होती.

मात्र आता या सेवेत वाढ करुन ती दिल्लीपर्यंत सुरु केली आहे. यामुळे नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी शिख भाविकांची व अन्य प्रवाशांची सोय झाली आहे. नांदेडहूनही शिख बांधव अमृतसर येथील सुवर्णमंदीराचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. या दोन्ही पवित्र स्थळांना आता एअर इंडियाच्या विमानसेवेच्या माध्यमातून जोडल्या जात आहे. हे शिख भाविकांसाठी चांगली बाब असल्याचे सांगण्यात येते.

अशी असेल विमानसेवा

दिल्ली ते नांदेड हे विमान दिल्ली येथून ता. १९ डिसेंबर रोजी पहाटे ५. ५५ मिनीटाला उड्डाण घेऊन ते अमृतसरला सकाळी ७. १० वाजता पोहचेल. त्यानंतर ८. १० वाजता हे विमान उड्डाण करुन नांदेड येथे १०. ४५ वाजता पोहचेल. 
परत हे विमान नांदेड विमानतळाहून ११. ४५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी २. २० वाजता अमृतसर येथे पोहचेल त्यानंतर ३. २० वाजता अमृतसरहून निघून सायंकाळी ४. ३५ वाजता दिल्ली विमानतळावर उतरेल. 
ही विमानसेवा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सुरु राहणार आहे. सुरुवातीचे भाडे दिल्ली ते नांदेड हे तीन हजार ९५६ रुपये असणार आहे. १६२ आसनक्षमता असलेल्या या विमानसेवेचा कोवीडच्या नियमानुसार प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन गजेंद्र गुठे यांनी केले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Crime News : धुळ्याच्या विनोदचे सुरतमध्ये मोठे कांड ! १० हजारांच्या थकीत पगारासाठी मार्केटला लावली आग, १७ दुकाने भस्मसात,२४ कोटींचे नुकसान

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune-Bengaluru Highway: लिंब फाट्याच्या उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; आनेवाडीच्या २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT