Salary
Salary Sakal
नांदेड

केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांना मिळणार वेतनवाढ

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - पदवीधर शिक्षकांमधून केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांना वेतनवाढ देण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. त्यामुळे पदोन्नत केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठवाड्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख असून, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. तसेच जिल्ह्यातील शिक्षकांची संख्याही मोठी आहे. या शाळांचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने केंद्र प्रमुख नेमण्यात आले आहेत. एका केंद्रप्रमुखाकडे केंद्रीय शाळेतंर्गत येणाऱ्या शाळांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुख्याध्यापकाकडे सुद्धा केंद्रातील शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे.

मध्यंतरीच्या काळात माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी प्राथमिक पदवीधर शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिली होती. मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती मिळूनही त्यांना जास्तीचे काम लागत होते. त्याबदल्यात त्यांना हवा तेवढा पगार मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी होती. याच नाराजीतून त्यांनी वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांच्याकडे वेतनवाढीसाठी पाठपुरावा केला.

अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला गुरुवारी (ता. १६) मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी मान्यता दिली असून, पदवीधर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना एक वेतनवाढ देण्याचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना सुचित कले आहे. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित पदवीधर मुख्याध्यापक व केद्रप्रमुख यांना दिलेल्या वेतनवाढीची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेतही करण्याचे सीईओ यांनी आदेशीत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: पॉवर-प्ले कोलकाताच्या गोलंदाजांनी गाजवला, सलामीवीरांनंतर शाय होपदेखील परतला पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT