लाचखोर मुख्याध्यापक जाळ्यात 
नांदेड

सहस्त्रकुंड येथील मुख्याध्यापक कैलवाड लाचेच्या जाळ्यात

सहस्त्रकुंड येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेला नामदेव कैलवाड याने कंत्राटी मजूराला दोन हजार रुपयाची मागणी केली.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथे असलेल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा मुख्याध्यापक नामदेव कैलवाड हा दीड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. कंत्राटी मजुराचे चार महिन्याचे बिल तयार करुन त्याचा मोबदला देण्यासाठी बक्षिस म्हणून स्विकारली लाच. ही सापळा कारवाई सहस्त्रकुंड येथे बुधवारी (ता. ३०) करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की नांदेड शहराच्या वैभवनगर, जैन मंदीर परिसर, मालेगाव रोड भागात राहणारा व सध्या सहस्त्रकुंड येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेला नामदेव कैलवाड (वय ५६) याने कंत्राटी मजूराला दोन हजार रुपयाची मागणी केली. तडजोडअंती ही लाच दीड हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेडला येऊन रितसर लाचखोर मुख्याध्यापकाच्या विरोधात मंगळवारी (ता. २९) जून रोजी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी सापळा लावला आणि या सापळ्यामध्ये लाचखोर मुख्याध्यापक दीड हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा - सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं"

त्यावरुन एसीबीने बुधवारी (ता. 30) जून रोजी याच आश्रम शाळा परिसरात सापळा लावून लाचखोर मुख्याध्यापक कैलवाड याला रंगेहात पकडण्यात आले. इस्लापूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश पुरी, संतोष शेटे, एकनाथ गंगातीर्थ, दर्शन यादव, शेख मुजीब यांनी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT