Holi Great idiot poets convention Kavi sammelan nanded
Holi Great idiot poets convention Kavi sammelan nanded sakal
नांदेड

होळीनिमित्त आज महामूर्ख कविसंमेलन

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : होळी सणानिमित्त महामूर्ख कवी संमेलन गुरुवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत कलामंदिर गंधर्वनगरी येथे फक्त सोळा वर्षावरील तरुण व पुरुषांसाठी होणार असल्याची माहिती संयोजक ॲड. दिलीप ठाकूर, पत्रकार गोवर्धन बियाणी, डॉ. हंसराज वैद्य यांनी दिली आहे.

माणसाचे मनात अनेक भावना असतात पण त्यांना व्यक्त करता येत नाहीत. त्या भावनांचा निचरा करण्यासाठी पुरातन काळापासून होळीचा सण साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर होलिका उत्सव समिती व कला मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात येणारे नांदेडचे महामूर्ख कवी संमेलन देशातील दुसऱ्या क्रमांकाचे कवी संमेलन ओळखले जाते. गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे हे कवी संमेलन झाले नसल्याने रसिकांचा हिरमोड झाला होता. यंदाचे हे विसावे वर्ष आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कविसंमेलनाचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी मर्चंट बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते तर विशेष अतिथी म्हणून भाजप दिव्यांग आघाडी प्रदेश संयोजक रामदास पाटील सुमठाणकर व उद्योजक अखिलेश गुप्ता उपस्थित राहणार आहेत.

प्रसिद्ध कवी अनिल आवारा (बनारस), शायर रफिक नागरी (इंदोर), सरदार सुखप्रीत सिंह (भोपाल) हे द्विअर्थी काव्य प्रतिभेतून होळीचा रंग उधळणार आहेत. या शिवाय हास्यसम्राट सिद्धार्थ खिलारे, शाहीर रमेश गिरी, सतीश कासेवाड, प्रा. रविंद्र अंबेकर, लच्छु देशमुख, बजरंग पारीख, राजेंद्र शर्मा, वैजनाथ जाधव, रेशमाजी हिंगोले, संजय व्होरा, सुरेश बामालवा, संजय बोधने, विलास जोगदंड हेही कविता सादर करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT