Nanded News 
नांदेड

Video : झिरो बजेट शेती ठरतेय शेतकऱ्यांसाठी आदर्श, कशी? ते वाचाच

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : हल्लीच्या काळात प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याच्या मागे लागला आहे. या मोहापायी तो आपल्या शेतीत अनेक प्रकारच्या रासायनिक खताचा, औषधींचा वापर करून स्वतःच जमिनीचा पोत खराब करीत आहेत. तसेच मिळालेले उत्पन्नही विषारी होत असल्याने ते अन्न खाणाऱ्यांच्या जिवावर बेतत आहे.

कहाळा बुद्रुक (ता.नायगाव) येथील माजी प्रा. विठ्ठल नारवाड यांनी पिकाच्या उत्पन्नापेक्षा कमी खर्चामध्ये सकस व शरीरास पोषक असे बिनविषारी अन्नधान्याचे उत्पन्न मिळविण्याच्या हेतूने मागील तीन वर्षांपासून रासायनिक खत, औषधींच्या वापराविना ‘झिरो बजेट शेती’ करत शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

श्री. नारवाड हे नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात क्रिडा शिक्षक होते. २००१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून दहा वर्षे काम केले. या काळातही त्यांनी गावातील शाळा, सार्वजनिक ठिकाणांची आवर्जून दखल घेत आवश्यक तेथे मदत केली आहे. आजही ते शेती सांभाळून गावाच्या विकासास हातभार लावत आहेत. हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या शेतजमिनीकडेही लक्ष दिले आहे. 

शेंद्रिय पद्धतीनेच पिकांची जोपासना
त्यांना सात ते आठ हेक्टर जमीन आहे. यातून होणारे उत्पन्न हे विषारी व पोषक असावे, या हेतूने त्यांनी झिरो बजेट शेती करण्यावर भर दिला. तीन-चार वर्षांपासून ते त्यांच्या शेतात घेणाऱ्या पिकांसाठी रासायनिक खत, औषधींचा बिलकूलही वापर करत नाहीत. खरिपामध्ये ज्वारी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस तर रब्बीमध्ये हरबरा, करडई, टाळकी ज्वारी, गहू आदी पिके ते घेत आहेत. संपूर्ण शेंद्रिय पद्धतीने विठ्ठल नारवाड पिकांची जोपासना करतात.

विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे
शेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या मालातून चांगले उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी शेंद्रिय खत, औषधी तयार करण्यासाठी शेण व गोमूत्राची आवश्यकता असल्याने गाय व जनावरेही पाळली आहेत. त्या जनावरांपासून मिळणारे शेण व मूत्राचा पिकांसाठी वापर करतात. त्यांची ‘झिरो बजेट शेती’ ही इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत असून, सर्व शेतकऱ्यांनी कमी खर्चात व विषमुक्त उत्पादनासाठी ‘झिरो बजेट शेतीकडे’ वळावे, असा मंत्रही विठ्ठल नारवाड यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT