nanded sakal
नांदेड

Nanded News : नांदेडला पडतोय व्यसनाचा विळखा

अमली पदार्थ येतात कुठून? पोलिसांना द्यावे लागणार लक्ष दिवसेंदिवस वाढत जाणारे नांदेड आणि एज्युकेशन हब बनत असताना दुसरीकडे अंमली पदार्थांची कारवाई लक्षात घेता आता पोलिसांना दक्ष राहून लक्ष द्यावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गेल्या वीस दिवसांत अंमली पदार्थाच्या पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाद्वारे तीन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून नांदेडला अंमली पदार्थांच्या माध्यमातून व्ससनाचा विळखा पडतोय की काय? असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे नांदेड आणि एज्युकेशन हब बनत असताना दुसरीकडे अंमली पदार्थांची कारवाई लक्षात घेता आता पोलिसांना दक्ष राहून लक्ष द्यावे लागणार आहे.

नांदेडमध्ये रेल्वे स्थानकासमोर दुसऱ्या राज्यातून आलेल्या एक तरूण आणि एका तरुणीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे सात लाख ३२ हजाराचा अंमली पदार्थ अफू सापडला. किनवटला एक लाख ३२ हजाराचा गांजा आणि रोख रक्कम सापडली. नांदेडमध्ये शिवाजीनगर भागात एक लाख आठ हजाराचा गांजा सापडला. त्यामुळे खळबळ उडाली असून हे अंमली पदार्थ येतात कुठून असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्या अर्थी कारवाई होते त्यामुळे या अंमली पदार्थांची विक्रीही होत असणार हे उघड आहे. त्यामुळे आता पोलिस विभागाला देखील सतर्क रहावे लागणार आहे.

पालकांना सतावतेय चिंता

त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, संघटना, आजी माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक यांना देखील सहकार्य करावे लागणार आहे. नाहीतर व्ससनाचा विळखा आणखी घट्ट व्हायला वेळ लागणार नाही, असे मत अनेक सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे. काही वर्षांपासून या मुलांना कुठल्या ना कुठल्या नशेची सवय जडली असल्याचे मद्य व सिगारेटच्या वाढत्या विक्रीची आकडेवारी व आकडेवारीतून दिसत आहे. मुलांच्या नशेमुळे पालकांच्याही जिवाला घोर लागला असून, शहरातील अंदाजे २० टक्के मुले नशेच्या विळख्यात अडकली आहेत.

१८ ते ३० वर्षांच्या आतील आरोपी

अंमली पदार्थ कुठून येतात याकडे लक्ष ठेऊन त्याच्या मुळापर्यंत जाऊन शोध घ्यावा लागणार आहे. त्यासाठी विशेष यंत्रणा देखील कार्यान्वित करावी लागेल. नांदेड एज्युकेशन हब बनत असून राज्यातून विद्यार्थी चांगले शिक्षण मिळते म्हणून नांदेडला शिक्षणासाठी येत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत आरोपी देखील १८ ते ३० वर्षांच्या आतील आहेत. त्यामुळे या सगळ्या घटना घडामोडींकडे पाहता आता हे अंमली पदार्थ नशा करण्यासाठी कुठे जातात, हे शोधण्यासाठी पोलिसांना विशेष काम करावे लागणार आहे.

पूर्वी व्यसन करणाऱ्यांकडे समाज हा वाईट दृष्टिकोनातून पहात होता. त्यामुळे त्यांची भीती व्यसन करणाऱ्यामध्ये होती. मात्र गेल्या काही वर्षामध्ये थोड्या फार प्रमाणात समाजाचाही दृष्टिकोन बदलत चालला आहे. व्यसनाचे कुठेतरी समर्थन होताना दिसून येत आहे. मात्र असे करणे चुकीचे असून व्यसनाकडे सर्वांनीच गांभिर्याने पाहिले पाहिजे. तरूणाईला नेहमीच नवनवीन हवे असते. त्यामुळे तरुणाई व्यसनाला बळी पडत आहे.

- डॉ. संदीप देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ

पोलिस विभागाच्यावतीने सातत्याने अंमली पदार्थांच्या कारवाया होत असतात. याबाबत आणखी तपास सुरू असून काही आरोपी दोन-चार दिवसात ताब्यात येतील. विक्री करणाऱ्या पर्यंत पोलिस लवकरच पोचतील.

- उदय खंडेराय, पोलिस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या भावात घसरण; सलग 5 दिवसांच्या तेजीला ब्रेक, चांदीचे भाव मात्र वाढले

४ महिन्यात जाणवलं की आपला निर्णय चुकला... अखेर मयुरी वाघने सांगितलं घटस्फोटाचं कारण; म्हणते- ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने...

तालिबान सरकारच्या मंत्र्याची दिल्लीत पत्रकार परिषद, महिला पत्रकारांना बंदी; एस जयशंकर यांच्यासोबत बैठकीनंतरच्या घटनेनं संताप

Panchang 11 October 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्र पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

दशावतार, कांताराची क्रेझ अजून असताना येतोय 'गोंधळ'; मुलगी झाली हो अभिनेत्याची मुख्य भूमिका

SCROLL FOR NEXT