Nanded Crime News sakal
नांदेड

Nanded Crime News : जिल्ह्यात तीन घरफोड्यांत सहा लाखांचा ऐवज लंपास

जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण वाढले असून, तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या. यात एकूण पाच लाखांवर ऐवज लंपास करण्यात आला. जिल्ह्यातील कंधार, बिलोली व किनवट तालुक्यात घरफोडे सक्रिय झाल्याचे या घटनांवरून दिसून आले.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण वाढले असून, तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या. यात एकूण पाच लाखांवर ऐवज लंपास करण्यात आला. जिल्ह्यातील कंधार, बिलोली व किनवट तालुक्यात घरफोडे सक्रिय झाल्याचे या घटनांवरून दिसून आले.

पहिल्या घटनेत कंधार तालुक्यातील दिग्रस (बु.) येथे चोरट्याने मंगळवारी (ता. ४) जून रोजी फिर्यादीच्या राहत्या घराच्या मेन गेटचे व घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाची चावी घेऊन कपाट उघडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण तीन लाख ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला.

दुसऱ्या घटनेत बिलोली तालुक्यातील बाभळी येथे मंगळवारी (ता. ४) रोजी फिर्यादी व त्याची पत्नी हे त्यांच्या बहिणीकडे गेले असता अज्ञात आरोपीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट फोडून नगदी ९० हजार व दागिने असा एक लाख ९९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

तिसऱ्या घटनेत इस्लापूर (ता. किनवट) येथे मंगळवारी फिर्यादी हे घराला कुलूप लावून वहिनीच्या घरी गेले असता, चोरट्याने घराचे कुलूप तोडून बांधकामासाठी ठेवलेले नगदी ५० हजार व शेजारील माधव मोतेवार यांच्या घराचे कुलूप तोडून ११ हजार रुपये असा एकूण ६१ हजारांचा ऐवज लंपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT