file photo 
नांदेड

नांदेडातील घटना : सासूचा खून करणाऱ्या सुनेला व नातसुनेला पोलिस कोठडी 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पतीच्या बँक खात्यातून काढलेल्या वीस हजार रुपयांची भरपाई करण्यासाठी सुनेने नात सुनेच्या मदतीने सासूचा खून केल्याची घटना ता. आठ एप्रिल रोजी पावडेवाडी (ता. नांदेड) शिवारात घडली होती. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर दोन्ही महिला आरोपींना अटक करुन शुक्रवारी (ता. नऊ) न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्या दोघींना ता. १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.

शहराला लागूनच असलेल्या पावडेवाडी येथील रहिवासी असलेल्या एका कुटुंबातील चंद्रभागाबाई यांचे दोन महिन्यापूर्वी तीन हजार रुपये चोरीला गेल ेहोते. त्याचा संशय तिची नातसुन रोहिणी पावडे तिच्यावर होता. याबाबत चर्चा झाल्यानंतर सुनेने काटा काढण्याची धमकी दिली होती. दरम्यान चंद्रभागाबाईची सून लक्ष्मीबाई हिने तिचा पती रमेश पावडे यांच्या बँकेतून वीस हजार रुपये काढून कोणाला तरी दिले होते. याबाबत रमेश तिला विचारणा करीत होता. त्या पैशाची भरपाई करण्यासाठी लक्ष्मीबाई पावडे व तिची सून रोहिणी यांनी सहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास चंद्रभागाबाई पुरभाजी पावडे (वय ७०) हीस दवाखान्यात नेण्याचा बहाणा करुन दोघेही पावडेवाडी शिवारातून जात असलेल्या नाल्यात नेऊन चंद्रभागाबाई यांचा गळा आवळून व हातपाय बांधून खून केल्यानंतर तिचा मृतदेह बाबळीच्या झुडपात असलेल्या नाल्यात फेकून दिला.

यावेळी आरोपींनी वृद्ध महिलेच्या कानातील सहा ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या, दोन म्हणी व एक सोन्याचे पान काढून घेऊन सराफा बाजार येथे एका व्यापाऱ्याकडे विक्री करुन आलेले वीस हजार रुपये रमेश पावडे यांना परत केले. या प्रकरणातील सदर प्रथम महिला हरवल्याची नोंद केल्यानंतर मयत महिलेची मुलगी ज्योती कल्याणकर दोन मुलांनी तिचा शोध घेतला. यावेळी चंद्रभागाबाईचा मृतदेह नाल्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके व त्यांच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी ज्योती कल्याणकर यांच्या फिर्यादीवरुन दोन महिलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघींनाही अटक केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT