File photo
File photo 
नांदेड

Video - विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांच्या अडचणीत वाढ

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनामुळे संपूर्ण देश लाॅकडाउन केला. त्यामुळे सर्व व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. स्कुल बस, व्हॅन, मॅजिक, अॅटोमधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला तर पूर्ण विरामच मिळाला आहे. अनिश्चित तारखेपर्यंत होणाऱ्या शाळेच्या बंदमुळे, कधी शाळा सुरु होतील सध्यातरी काहीच सांगता येत नाही.

नांदेडची भौगोलिक परिस्थिती बघता बऱ्याच जुन्या भागात छोटे-छोटे रोड आहेत. त्यामुळे मोठ्या स्कुल बस तिथपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे अाॅटो, व्हॅन, मॅजिक या छोट्या-छोट्या वाहनातूनच विद्यार्थ्यांची ने आण मोठ्या प्रमाणावर होते. नांदेड जिल्ह्यात स्कुल बस या मोठ्या प्रमाणात असून, नांदेडमधील सर्व चांगल्या व मोठ्या इंग्लिश मिडियमच्या शाळा या गावाच्या बाहेर आहेत. गुरुतागद्दीमुळे जी नांदेडची प्रगती झाली (उदा. मोठे रोड, पुल, उड्डाणपुल) यामुळे स्कुल बसला फायदा झाल्याने मोठ्या प्रमाणात स्कुल बस शहरात वाढल्या आहेत.

पालक देतील का जास्त पैसे?
शासनाने जरी शाळा सुरु केल्या, आणि वाहतुक सुरु झाली तर सोशल डिस्टन्सिंगच्यामुळे शासन काय निर्णय घेणार? किती विद्यार्थी राहतील? याचा काहीच अंदाज येत नाही. विद्यार्थी जर सोशल डिस्टसिंगमुळे कमी बसवले तर चालक, मालक यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पालक जास्त पैसे देणार का? हाही गंभीर प्रश्न आहे. 

शासनाने ठोस निर्णय घ्यावा
आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवीन पिढीसाठी सतत प्रयत्न करणाऱ्या स्कुल बस, व्हॅन चालकांचा कोणीही सकारात्मक विचार करायला तयार नाहीत. सर्वांचे आर्थिक नुकसान होत असून, त्यांच्यावर पर्यायाने कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हा स्कुल बस व्हॅन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केली आहे.  

व्यवसाय दिवाळीपर्यंत बंद राहण्याचे संकेत
जिल्ह्यात ऑटोचालकांची संख्या लाखाच्या घरात आहे. अनेकांनी व्यवसाय होत नसल्याने ऑटोमधून शिकवणी वर्ग, शाळेतील मुले सोडण्याचे काम करायचे. पण, आता ऑटो व मिनी स्कूलव्हॅन रस्त्यावर कधी धावणार, अजूनही सांगता येत नाही. शाळा कधी सुरू होतील, निश्‍चित नाही. त्यामुळे हा व्यवसाय दिवाळीपर्यंत बंद राहण्याचे संकेत दिसत असल्याने या वर्गावर उपासमारीची वेळ येईल असे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे. 

लोकप्रतनिधींचेही दुर्लक्ष
लोकप्रतिनिधींचे आजही या वर्गाकडे लक्ष नाही. ऑटोचालक हा इतरांप्रमाणे माणूस असून त्यांच्याही काही गरजा आहेत. हा वर्ग ऑटोच्या परमिट व परवान्याचे नूतनीकरण, गाड्यांचे पासिंग, रस्ता टॅक्‍स, पीव्हीसी आदींचा भरणा करून शासनाच्या तिजोरीत भर घालतो. पण, सरकार त्यांची साधी दखलही घेत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.  

शासनाने लक्ष द्यावे
आॅटो, मॅजिक, स्कूल व्हॅन चाल आपला जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांची सेवा करतो. त्यांना घरी सुखरूप सोडतो. रिपेअरिंग करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांवर सरकारला कर देतो. तरीही सध्याच्या कठीण परिस्थितीत शासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT