Meeting of Standing Committee of Nanded Waghala Municipal Corporation sakal
नांदेड

नांदेड : १४१ कोटी विकासकामांच्या निविदा मंजूर

स्थायी समितीची सभा; २८ विषयांना मिळाली मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती किशोर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.१७) झाली. यामध्ये एकूण २८ विषयांना मंजुरी देण्यात आली असून १४१.८६ कोटी रुपये किंमतीच्या विविध विकासकामांच्या निविदाही मंजुर करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, शुभम क्यातमवार, नगरसचिव अजितपालसिंघ संधू, स्थायी समिती सदस्य विरेंद्रसिंघ गाडीवाले, अब्दुल हफीज, बालाजी जाधव, राजु काळे, अब्दुल अलीम खान, महेंद्र पिंपळे, रेहाना बेगम कुरेशी चॉंद पाशा, फरहत सुलताना रशीद अन्वर, शांता गोरे यांच्यासह अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या बैठकीत शंभर कोटी रुपयांच्या कामांपैकी ८६.३० कोटी आणि ५० कोटी पैकी ४७.९१ कोटी व ७.६५ कोटी अशा एकूण १४१.८६ कोटी रुपयांच्या निविदा मंजुर केल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे महापालिकेला विकासकामासाठी निधी मिळत आहे. त्यातूनही अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील, असा विश्वास सभापती श्री. स्वामी यांनी व्यक्त केला.

गुंठेवारी प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत अशा सूचना सभापती श्री. स्वामी यांनी दिल्या. आकृतीबंध बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, तो देखील तयार करावा. त्यातील त्रुटी दुरुस्त करून शासनाकडून त्याला मंजुरी मिळवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. रमाई आवास योजनेअंतर्गत मंजुर लाभार्थ्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचना त्यांनी दिली.

वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष

नांदेड शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे तर काही ठिकाणी पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शहरात कोणकोणत्या भागात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देता येईल, या दृष्टीने सभापती किशोर स्वामी यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना जागा पाहण्याच्या सूचना केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT