कुंडलवाडीचे शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत 
नांदेड

कुंडलवाडीचे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

कुंडलवाडी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या अंतर्गत शहर व परिसरातील पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते.

अमरनाथ कांबळे

कुंडलवाडी (जिल्हा नांदेड ) : येथील बँक ऑफ बडोदा या शाखे अंतर्गत असलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019- 20 मधील पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होऊन बँकेच्या निष्काळजीपणामुळे जमा झालेली रक्कम परत शासनाकडे वर्ग झाल्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले. त्यांना त्वरित कर्जमाफीचा लाभ मिळावा व नवीन कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

कुंडलवाडी येथील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या अंतर्गत शहर व परिसरातील पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते. त्यानंतर शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019- 20 अंतर्गत वरील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा ही करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी विनंती बँक अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांनी केली. पण बँकेच्या अधिकाऱ्यानी उडवाउडवी करत जमा झालेली कर्जमाफीची रक्कम परत शासनाकडे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

हेही वाचा - थकबाकी वसुलीस गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यास अर्धापूरात मारहाण

त्यामुळे अनेक शेतकरी आजतागायत कर्जमाफीपासून वंचित असून त्यांना कुठलेही आता नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्त करुन नवीन कर्ज उपल्बध करुन देण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर मनसे शहराध्यक्ष साहेबराव कोंडावार, माधव चंदनकर, नागनाथ वारले, मारोती चंदनकर, ननुबाई घारके, हरिदास काळेकर, शिवमनी नागुलवार, गंगाधर चंदनकर, हुसाजी माहेवार, शिवराम चंदनकर, लक्ष्मण धुप्पे, शंकर दुप्तले, नागराज तुंगेनवार, त्रिशूल चुनडे आदीसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT