lost mobile phones get back worth rs 1 cr 13 lakh nanded cyber police action
lost mobile phones get back worth rs 1 cr 13 lakh nanded cyber police action esakal
नांदेड

Nanded News : तब्बल एक कोटी १३ लाखांचे मोबाइल मिळाले परत

अभय कुळकजाईकर

Nanded News : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी त्याच्यासोबत आता मोबाईलचा देखील समावेश करावा लागणार आहे. कारण मोबाईलशिवाय मानवाचे जगणे अवघड झाले असून ते जवळपास सर्वांनाच मान्य आहे.

त्यामुळे असा जीव की प्राण असलेला मोबाईल हरवला तर? विचारायलाच नको की काय अवस्था होईल. नांदेडच्या सायबर पोलिस विभागाने असेच चोरी झालेले, हरवलेले, गहाळ झालेले तब्बल ७६५ मोबाईल यंदाच्या वर्षभरात शोधून काढले आहेत. त्याची किंमत देखील एक कोटी १३ लाखाच्या घरात आहे.

सध्या प्रत्येक पोलिस ठाण्यात दिवसभरातून एक का होईना मोबाईल चोरीला किंवा हरवल्याची तक्रार दाखल होत असते. त्यामुळे असे हरवलेले, चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्याचे काम म्हणजे पोलीसांसमोरही आव्हानच असते.

सोशल मीडियाद्वारे फसवणुक तसेच गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे नांदेडला देखील जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र सायबर पोलीस विभाग सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी सायबर संदर्भातील तक्रारींची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी यांनी दिली.

यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यापासून ते आत्तापर्यंत २०२३ वर्षात सायबर पोलिसांनी तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांचे गहाळ झालेले एकूण ७५६ मोबाईल हस्तगत केले आहेत.

त्याचबरोबर सदरील मोबाईलची शहानिशा करून आणि कागदपत्रे तपासून ते मोबाईल मुळ मालकास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते परत देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांचे मोबाईल परत मिळाले त्यांच्या आनंदाला पारावार उरला नसेल, हे वेगळे सांगायला नकोच. मोबाईल परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगत होता.

मोबाइलची अशी घ्या काळजी

  • मोबाईलला पासवर्ड, फिगरप्रिंट, फेसलॉक करून ठेवावे.

  • आपल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक जतन करुन ठेवावा. आपल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मिळू शकतो. त्यासाठी आपल्या मोबाईलवर *#06# टाईप करावे. मोबाईलच्या पाठीमागील बाजुस बॅटरीच्या खाली. मोबाईल खरेदी करतवेळी ओरीजनल पॅकींगच्या बॉक्सवर, फोन सेटींगचे अबाऊटमध्ये, सीमकार्डचे स्लॉटमध्ये आणि मोबाईल खरेदी बिलावर हा क्रमांक मिळू शकतो.

  • मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्यावर सर्वप्रथम संबधित पोलीस ठाण्यात तक्रार देणे.

  • चोरी, गहाळ झालेले सीमकार्ड पुन्हा सुरु करून घेणे.

  • चोरी, गहाळ झालेले मोबाईल CEIR PORTAL वर ONLINE FORM भरल्यानंतर रिकवेस्ट आयडी प्राप्त होतो, तो सांभाळून ठेवावा

जुना मोबाइल खरेदी करताना...

केंद्र शासनाच्या संचार साथी पोर्टलवरील KNOW YOUR MOBILE APP वर मोबाईलचा आयएमईआय चेक करून खरेदी करावा. मोबाईल किंवा चोरीचा गहाळ असल्यास IMEI IS BLACK LISTED Do not use this device without permission असा मेसेज दाखवितो, त्यामुळे असा मोबाईल खरेदी करु नये. तसेच अशा प्रकारचा मोबाईल अनावधानाने प्राप्त झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस विभागात आणून जमा करावा.

मोबाइल चोरी, गहाळ झाल्यास..

आपल्या मोबाईलच्या ई - मेल आयडीच्या सेटिंगमध्ये FIND A LOST DIVICE मध्ये लोकेशन ऑन करून ठेवावे. त्यामुळे आपला मोबाईल चोरी, गहाळ किंवा हरवल्यास आपल्या ई - मेल आयडीमध्ये त्याचे लोकेशन दाखविते आणि आपला मोबाईल आपल्यालाच तत्काळ मिळवता येवू शकतो, अशी माहिती सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT