file photo 
नांदेड

एमपीएससी परीक्षार्थींनो जाणून घ्या : नांदेड जिल्ह्यात 34 केंद्रावर नऊ हजार 816 विद्यार्थी देणार परीक्षा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगची परीक्षा ता. 21 मार्च रोजी होणार असून जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. शहरातील 34 केंद्रावर नऊ हजार 816 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी एक हजार 56 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. परीक्षा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील कोरोनाची चाचणी घेण्याचे काम सुरु झालेले आहे. ता. 21 मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी एक व दुपारी तीन ते पाच या वेळेत परीक्षा होणार आहे.

असे आहेत परिक्षा केंद्र 

शहरातील यशवंत वरिष्ठ महाविद्यालय तळ व पहिला मजला बाबानगर या केंद्रावर 480 परिक्षार्थी, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय 384, यशवंत महाविद्यालय सायन्स इमारत 192, नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय 288, शासकीय तंत्रनिकेतन बाबानगर 264, आदर्श विद्यालय टिळकनगर 192, महात्मा फुले हायस्कूल पहिला मजला बाबानगर 300, सावित्रीबाई माध्यमिक शाळा 192, प्रतिभा निकेतन हायस्कूल कैलासनगर 240, सायन्स कॉलेज 307, पीपल्स कॉलेज 384, नागसेन हायस्कूल, प्रभातनगर 192, राजर्षी शाहू विद्यालय 336, एमजीएम 360, केंब्रिज विद्यालय 480, पीपल्स हायस्कूल 192, विद्यामंदीर 240, टायनी एंजल्स लक्ष्मीनगर वाडी बुद्रुक 288, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बुद्रुक 480, आंध्र समिती हायस्कूल गवळीपुरा 240, खालसा हायस्कूल बाफना टी पॉइंट 192, शारदाभवन हायस्कूल जुना मोंढा 240, प्रतिभा निकेतन महाविद्यालय बंदाघाट 240, गुजराती हायस्कूल वजीराबाद 432, नेताजी सुभाषचंद्र बोस तारासिंग मार्केट 192, नागार्जुन पब्लिक स्कूल कौठा 384, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको 336, कुसुमताई माध्यमिक शाळा सिडको 240, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको 240, इंदिरा गांधी हायस्कूल सिडको 240, इंजीनियरिंग कॉलेज विष्णुपुरी 264, सेवाभावी संस्थेचे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी 288, सहयोग सेवाभावी संस्थेचे अध्यापक महाविद्यालय विष्णुपुरी 192, महात्मा फुले हायस्कूल तळमजला बाबानगर 192 असे एकूण नऊ हजार 816 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

विद्यार्थ्यांना तीन वेळा सॅनिटायझर होणार

परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका हॉलमध्ये चोवीस विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था सोशल डिस्टंसिंगनुसार करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन वेळा सॅनिटायझर करण्यात येणार आहे.

पॉझिटिव आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पीपी कीट देण्यात येणार 

एमपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी जर कोरोना पॉझिटिव आलाच तर त्या विद्यार्थ्यांना पीपी किट देण्याची व्यवस्था करण्यात येणार असून स्वतंत्र बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे राहणार लक्ष

नांदेड शहरात एमपीएससीची नऊ हजार 816 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेवर जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांचे विशेष लक्ष राहणार असून सोयीसुविधा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते लक्ष ठेवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांना मोठा दिलासा! १५ ते २४ जूनदरम्यान जड वाहनांना नो-एंट्री; ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

राजघराण्यात वादातून रक्तरंजित थरार, पहिल्या पत्नीवर दुसऱ्या पत्नीने झाडली गोळी

MPSC Success Story: वयाच्या ७व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले! जिद्दीच्या जोरावर अजय यलगंदकर बनले PSI; आईच्या कष्टाचे चीज केलं, संघर्षाला यशाची किनार..

NEET मध्ये अपयश, मग बनला फेक ब्रिगेडियर; दोन कमांडो, खांद्यावर स्टार्स, गाडीवर झेंडा... 21 वर्षीय तरुणाचा धक्कादायक कारनामा!

Petrol-Diesel-CNG Price Today: कच्च्या तेलाचे भाव घसरले; पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

SCROLL FOR NEXT