Nanded News 
नांदेड

Video - मुस्लिम बांधवांनी केली अल्लाहकडे प्रार्थना, कशानिमित्त? ते वाचाच 

प्रमोद चौधरी

नांदेड : रमजान महिण्यात कोरोनाचे संकट आल्याने ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी (ता.२५ मे) शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी घरामध्येच नमाजपठण करून ईद साजरी केली असून, अल्लाहकडे विशेष प्रार्थनाही केली. 

रमजान महिण्यात शहरातील सर्वच मस्‍जिदमध्ये ईदची नमाज अदा केली जाते. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाउन, जमावबंदीचे आदेश असल्याने ईदची देगलूर नाका परिसरातील इदगाह मैदानावर होणारी सामुदायिक नमाज रद्द करून ती घरीच अदा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. शहर व जिल्ह्यात या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी घरामध्येच नमाज अदा करून ईद साजरी केली. तसेच शिरखुर्मा तयार करून तो नातेवाईकांसह मित्रमंडळींना घरी बोलावून तो दिला जातो. यावर्षी मात्र कोणालाही आमंत्रित न करता शिरखुर्मा तयार करून प्रत्येकाना त्‍याचा घरीच आस्‍वाद घेतला.  

हेही वाचा - Video - पालकमंत्री अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईला रवाना...
 
अल्लाहकडे केली प्रार्थना
कोरोनामुळे संपूर्ण जग हैराण झालेले आहे. कोरोना विषाणुला हरविण्यासाठी देश लॉकडाउन केला असला तरी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  त्याचा परिणामी सामाजिक जनजिवनावर होत असून, अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे उपासमारीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे देशावरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी नमाजपठण करून अल्लाहकडे केली.
  
वस्‍तू खरेदीसाठी गर्दीच नाही
दरवर्षी ईद सणानिमित पंधरा दिवस अगोदरपासून बाजारामध्ये नवीन कपडे, बुट, विविध प्रकारच्या बांगड्या, शिरखुर्मासाठी लागणारे ड्रायफ्रुट खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची विशेषतः महिलांची मोठी गर्दी असते. परंतु, यंदा कोरोनामुळे देश लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे सर्वप्रकारची दुकाने बंद असल्याने संपूर्ण रमजान महिना घरातच गेला. रमजान ईदच्या दोन दिवस अगोदर बाजारपेठ सुरु झाली. परंतु, अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे खरेदी करणे अवघड झाले. एकंदरीतच रमजान ईदला प्रथमच नवीन कपडे मुस्लिम बांधवांना खरेदी करता आले नाही.  

येथे क्लिक कराच - लॉकडाउन : ‘या’ शहरातील वाहनधारकांना तीन कोटींचा दंड 
 
व्हॉट्‍सॲप, फोनवरून शुभेच्छा
कोरोनाच्या संकटामुळे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत ईदचा सण सोमवारी साजरा करण्यात आला. नांदेड शहरासह तालुक्‍यातील अनेक गावात देखील घरोघरीच नमाजनपठण करून ईद-उल-फित्र साजरी करण्यात आली. बच्चे कंपनींनी एकमेकांच्या गळाभेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. तर काहींनी घरूनच व्हॉटसअपवर तसेच फोन करून रमजान ईदच्या शुभेच्‍छा देणे पसंत केले. इतिहासामध्ये प्रथमच यंदा रमजान ईदचा सण घरोघरी उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT