Nanded 102 ambulance driver salary issue 
नांदेड

Nanded : १०२ रुग्णवाहिका चालकास वेतन मिळेना!

सात महिन्यांपासून रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ

अमरनाथ कांबळे

कुंडलवाडी : नांदेड जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका चालकांची भरती ही बाह्य यंत्रणेकडून कंत्राटी पद्धतीने करण्यात आली असून त्या संबंधित संस्थेच्या कंत्राकदाराने गेल्या सात महिन्यांपासून रुग्णवाहिका चालताना वेतन न दिल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर त्या चालकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तत्काळ कंत्राटदाराकडून वेतन मिळून देण्यात यावे यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागात गेल्या अनेक वर्षापासून बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून आरोग्य विभागातील पदे भरली जात आहेत. त्याच अनुषंगाने १०२ रुग्णवाहिका चालकांचीही भरती करण्यात आली, पण संबंधित संस्थेच्या कंत्राटदाराकडून मार्च ते सप्टेंबर २०२२ पर्यंतचे वेतन रुग्णवाहिका चालकांना अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर रुग्णवाहिका चालकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून ता.२१ ऑक्टोंबरपर्यंत सर्व १०२ रुग्णवाहिका चालकाच्या खात्यावर थकीत वेतन जमा करून द्यावे, अन्यथा ता.२२ ऑक्टोंबर पासून सर्व १०२ रुग्णवाहिका चालक आपआपल्या कार्यरत ठिकाणी काम बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदार व प्रशासनाची असेल अशा आशयाचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांना १०२ रुग्णवाहिका चालकांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT