file photo 
नांदेड

नांदेडला सोमवारी १५ पॉझिटिव्ह; ३६ बरे तर एकाचा झाला मृत्यू

अभय कुळकजाईकर

नांदेड -  कोरोना बाधितांवर उपचार सुरू असताना सोमवारी (ता. १४) एकाचा मृत्यू झाला तर १४ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. दरम्यान, दिवसभरात १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३६ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातील सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ९४.९६ टक्के झाले आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. सोमवारी (ता. १४) सायंकाळी प्राप्त झालेल्या ४९८ अहवालापैकी ४७५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या २० हजार ८६० झाली आहे. आढळून आलेल्या १५ रुग्णांमध्ये नांदेड महापालिका क्षेत्रातील ११, नांदेड ग्रामिणमध्ये एक, लोहा एक, मुदखेड एक आणि यवतमाळ मधील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय कोविड सेंटर येथे उपचार सुरु असताना डौर (ता. अर्धापूर) येथील ७५ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ५६१ झाली आहे.

३६ रुग्णांना औषधोपचारानंतर सुटी 
सोमवारी दिवसभरात ३६ कोरोना रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत सुटी दिलेल्या रुग्णांची संख्या १९ हजार ८१० झाली आहे. ३६ रुग्णांमध्ये विष्णुपुरीतील शासकीय रुग्णालयातील एक, महापालिका अतंर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील २२, हिमायतनगरचा एक, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल सेंटरमधील एक, हदगावचा एक आणि खासगी रुग्णालयातील दहा रुग्णांचा समावेश आहे. 

२९४ रुग्णांवर उपचार सुरू 
सध्या २९४ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामध्ये विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात २७, जिल्हा रुग्णालयात २६, नवीन इमारतीत २२, मुखेड कोविड रुग्णालयात सहा, देगलूरला पाच, हदगावला सहा, किनवटला सहा, हैदराबादला संदर्भित एक, नांदेड महापालिका गृह विलगीकरणात १४८, जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृह विलगीकरणात २९ तर खासगी रुग्णालयात २४ जणांचा समावेश आहे. सोमवारी (ता. १४) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६६ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे ६९ खाटा शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली. 

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण स्वॅब - एक लाख ६४ हजार १७४
  • निगेटिव्ह स्वॅब - एक लाख ३९ हजार ३१०
  • एकूण पॉझिटिव्ह - २० हजार ८६०
  • एकूण बरे - १९ हजार ८१०
  • एकूण मृत्यू - ५६१
  • सोमवारी पॉझिटिव्ह - १५
  • सोमवारी बरे - ३६
  • सोमवारी मृत्यू - एक
  • रुग्णालयात उपचार सुरू - २९४
  • अतिगंभीर रुग्ण - १४
  • प्रलंबित स्वॅब - ४३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press : १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे वगळणाऱ्या सूर्यकांतला राहुल गांधींनी थेट स्टेजवरच आणले...खुलासा ऐकून सगळेच अवाक्

हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी, इलेक्शन कमिशनमधूनच मिळतेय मदत; राहुल गांधी काय म्हणाले?

Windows 10 : ऑक्टोबर महिन्यांपासून बंद होणार विंडोज 10 चा फ्री सपोर्ट; लाखो वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात, आता काय करावं? जाणून घ्या

Fake Massege Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची बनावट मेसेजद्वारे फसवणूक, अब्दुललाटच्या दोघांवर गुन्हा; का आहे नेमकं प्रकरण?

Baba Adhav : ...अन्यथा राज्यव्यापी जेल भरो आंदोलन, डॉ. बाबा आढाव; माथाडी कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्याची मागणी

SCROLL FOR NEXT