file photo 
नांदेड

नांदेड : कुरुळा आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाच आजारी, रुग्णांची परवड थांबेना

विठ्ठल चिवडे

कुरुळा (ता. कंधार, जि. नांदेड) ः रुग्णांची शुश्रूषा करण्यासाठी रुग्णवाहिकेवर मोठी जबाबदारी असते. किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना प्रसंगानुरूप वेळेत उपचार व्हावा या हेतूने रुग्णवाहिका आरोग्य केंद्राच्या समोर सज्ज असणे गरजेचे असते. परंतु कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व काही आलबेल असून मागील पंधरा दिवसांपासून १०२ रुग्णवाहिका कंधार व कुरुळा दरम्यान रस्त्याच्या बाजूला बंद अवस्थेत पाहायला मिळते.

आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र
कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्र कुठल्या ना कुठल्या बाबीने सतत चर्चेत असते. कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, रिक्त पदे, अनेक आवश्यक बाबींचा तुटवडा आणि तत्सम विविध कारणे हे नेहमीचेच असले तरी निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांची त्यात भर पडताना दिसत आहे. येथील आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्राचा समावेश असून जवळपास सत्तेचाळीस खेड्यांचा संपर्क येतो. या मुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण आस्थेवाईकपणे उपचारासाठी येतात. गरोदर माता प्रसूती, स्तनदा माता यासह इतर किरकोळ रुग्णांना उपचारासाठी इतरत्र रेफर केल्यानंतर १०२ च्या अनुपस्थितीमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचानांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात करडईचे क्षेत्र वाढले -

फरफट थांबवावी अशी मागणी
गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आर्थिक आधार व्हावा हा उद्देश असतानाही प्रशासन मात्र कुंभकर्णी अवस्थेत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात चालक जोगेंद्र ढवळे यांनी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण जाधव यांना कळवले असता अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. मागील अनेक वर्षांपासून आरोग्य केंद्रात गर्भवती स्त्रियांची प्रसूती बंद आणि आता मागील पंधरा दिवसापासून रुग्णवाहिका बंद असल्याने रेफर केल्यानंतर याचा थेट आर्थिक फटका रुग्णांना बसत आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन रुग्णांची होणारी फरफट थांबवावी अशी मागणी होत आहे.


मागील पंधरा दिवसापासून नेहरूनगर येथील माझ्या घरासमोर रुग्णवाहिका बंद अवस्थेत आहे. याकडे कुणीही लक्ष देत नाहीत कुणी आले नाहीत. कुणीही विचारपूस केली नाही.
- साहेबराव चव्हाण, ग्रामस्थ नेहरूनगर.


संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT