Nanded Bhokar Central Primary school 
नांदेड

नांदेड : इमारत असूनही शाळा भरते व्हरांड्यात

भोकरच्या नूतन शाळेतील प्रकार : मुख्याध्यापक बिनधास्त

सकाळ वृत्तसेवा

भोकर : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या केंद्रीय प्राथमिक नूतन शाळेची सुसज्ज इमारत आहे. दुर्गंधीचे कारण सांगून इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना चक्क व्हरांड्यात बसवून ज्ञानार्जन केल जात आहे. गुणवत्तेच्या बाबतीत सुध्दा ‘ढ’ असल्याचे दिसून येत आहे. मुलांचे आरोग्य धोक्यात आले असताना सुद्धा येथील मुख्याध्यापक मात्र मुग गीळून गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मागील दोन वर्षांपासून करोनामुळे शाळेला कुलूप लागले होते. यंदा कुठे शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. शाळा सुरू होवून जवळपास महिनाभर झाला. तालुक्यातील बहुतांशी शाळेत शिक्षकांची वाणवा आहे. शिक्षक कमी विद्यार्थी अधिक आणि शिक्षक अधिक विद्यार्थी कमी अशी दयनीय अवस्था आहे. बहुतांशी शिक्षक आपल्या सोयीनुसार नांदेडहून अपडाऊन करीत आहेत. त्यामुळे ज्ञानार्जनाकडे लक्ष न देता येण्याजाण्यात अधिक लक्ष असत, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांनी याकडे लक्ष देणं गरजेच आहे.

अधूनमधून येथील गटशिक्षण अधिकारी शाळेला भेटी देऊन सुचना करतात दौरा संपला की पुन्हा ‘पळसाला पान तीन’ अशी अवस्था आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शैक्षणिक बाबतीत त्वरीत लक्ष देऊन सुधारणा करावी अशी पालकांची मागणी आहे.

काहीच तोडगा निघाला नाही

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नूतन शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून विद्यार्थी संख्या (७००), शिक्षक (३८) आहेत. शाळेची सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. येथील पहिल्या वर्गातील मुलांना चक्क व्हरांड्यात बसवून ज्ञानार्जन केले जात आहे. याबाबत चौकशी केली असता शाळेच्या छतावर मुल, मुली लघूशंका करीत असल्याने शाळेच्या खोलीत दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले अशी माहिती मिळाली. या बाबतीत येथील शिक्षकांनी मुख्याध्यापिकास कल्पना दिली पण काहीच तोडगा निघाला नाही. नाईलाजास्तव मुलांना व्हरांड्यात बसवावे लागत आहे.

शाळेत सुविधांचा अभाव

येथील नूतन शाळेत ईमारत बांधकाम करताना विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मुतारी बांधण्यात आली. तीथे पाण्याची व्यवस्था नसल्याने घाण साचली आहे. स्वच्छतागृहाचे दरवाजे नादुरूस्त आहेत. नियमीत देखभाल दुरुस्ती केली जात नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शाळा परिसरात पाण्याचे डबके साचले आहे. तणानी डोके वर काढले आहे. शिक्षकावर कसलाच अंकुश नाही. याकडे कुणीच लक्ष देत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT