file photo 
नांदेड

नांदेड : बावीसाव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या समन्वयकपदी डॉ. हनुमंत भोपाळे 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई  पुरस्कृत बावीसाव्या बालकुमार साहित्य संमेलन, मुंबईच्या समन्वयकपदी व्याख्याते तथा साहित्यिक डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांची निवड करण्यात आली आहे.

ता. 27, 28 व 29 डिसेंबर रोजी हे संमेलन संपन्न होणार आहे. विज्ञान कथाकार बाळ फोंडके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असून भारत आणि भारताबाहेरील बालसाहित्यिक सहभागी होणार आहेत. या महत्त्वपूर्ण अशा संमेलनाच्या समन्वयकपदी डॉ. हनुमंत भोपाळे यांची निवड झाल्याचे संमेलनाचे संस्थापक प्राचार्य सतीश चिंदरकर यांनी कळविले आहे.

अर्धापूरच्या शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक, साहित्यिक डॉ. हनुमंत भोपाळे यांचे साहित्यविश्वात भरीव योगदान आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच यशाचा राजमार्ग या साहित्यकृतीची उत्कृष्ट साहित्यकृतीच्या यादीत नोंद केली असून या साहित्यकृतीच्या दोन आवृत्त्या संपल्या असून तिसरी आवृत्ती काही दिवसात प्रकाशित होणार आहे. डॉ. हनुमंत भोपाळे यांचे साहित्य व सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. डॉ. भोपाळे यांनी गोवा येथे संपन्न झालेल्या दोन दिवशीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षस्थान भूषविले आहे. ध्येयवेध, यशाचा राजमार्ग, प्रेरणा, शीख गुरू चरित्र आणि कार्य, पुन्हा प्रेरणा, दीपस्तंभ, प्रगतीचे विचारधन, साधना इत्यादी साहित्यसंपदा प्रसिद्ध असून डॉ. भोपाळे हे वेगवेगळी साहित्य संमेलने, चर्चासत्र, परिसंवाद आणि कार्यशाळेत सहभागी असतात. संत तुकाराम महाराजांच्या साहित्यावर त्यांनी संशोधन पूर्ण केले असून त्यांना विद्यार्थीदशेत महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

याशिवाय त्यांना जागर प्रकाशन पणजी, कोकण मराठी साहित्य परिषद, गोवा यांचेही उत्कृष्ट साहित्य लेखनाबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बहि:शाल व्याख्यानमालेचे व्याख्याते या नात्याने ते वैचारिक पेरणी करत असतात. उपक्रमशील व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या साहित्यिक डॉ. भोपाळे यांची बालकुमारसाहित्य संमेलनाच्या समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी खरच अनामिका बोट कापलं? २ सप्टेंबरला नेमकं काय घडलं? स्वत: दिलं स्पष्टीकरण...

अमरावतीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहकाच्या नावे परस्पर सिलिंडरची उचल, विना बुकिंग 'डिलिव्हरी'चा येतोय मेसेज

Sports News: महाराष्ट्रात कुस्ती पंचगिरीची परिस्थिती: तुटपुंजे मानधन आणि अवहेलनेमुळे आव्हाने

SCROLL FOR NEXT