Pik-Vima-Yojana Dheeraj Kumar  sakal
नांदेड

नांदेड : सहा लाख ६० हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

३१ जुलैपर्यंत मुदत; नांदेड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत खरिप हंगामात २०२२-२३ या वर्षासाठी आत्तापर्यंत शुक्रवार (ता. २२) अखेर राज्यभरातून ३९ लाख २१ हजार ९३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून सहा लाख ६० हजार ४८२ अर्ज दाखल झाले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची हानी होते आणि त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. ही योजना ता. ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारअखेर (ता. २२) नांदेड जिल्ह्यातील सहा लाख ६० हजार४८२ शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून नांदेड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी दिली आहे.

यावर्षी नांदेड जिल्हा प्रशासनाने दहा लाख

नोंदणीचे लक्षांक निर्धारित केले आहे. मागील वर्षी नऊ लाख दहा हजार नोंदणी झाली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः आत्तापर्यंत तीन वेळा विमा कंपनी आणि तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा पिक विमा भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना विविध माध्यमातून जनजागृती करून आवाहन करण्यात येत असल्याची माहिती श्री. चलवदे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT