nanded culture Buffalo pola celebrated procession of decorated buffaloes took attention of Ardhapur Sakal
नांदेड

Nanded News : म्हैस पोळा उत्साहात साजरा; सजवलेल्या म्हैस, रेड्याच्या मिरवणूकीने अर्धापूर करांचे लक्ष वेधले

दीवाळी पाडव्याच्या दिवशी अर्धापूर शहरातील गवळी समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने म्हैस रेड्याचा पोळा मंगळवारी (ता १४) सायंकाळी काढण्यात आला

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर : दीवाळी पाडव्याच्या दिवशी अर्धापूर शहरातील गवळी समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने म्हैस रेड्याचा पोळा मंगळवारी (ता १४) सायंकाळी काढण्यात आला.शहरातील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या म्हैस, रेड्यांची खास मिरवणूक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.शहरातील पशुपालकांनी दीवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देऊन उत्साहात दीवाळी साजरी करण्यात आली.

शहरातील गवळी समाज व पशुपालकांच्या वतीने दरवर्षी पारंपरिक पद्धतीने म्हैस रेड्याचा पोळा साजरा करण्यात येतो.शहरात गवळी समाज बांधव खूप मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी होतात.गवळी समाजाचा हा एक वर्षातील सर्वात मोठ्या सण मानला जातो.म्हशीला लक्ष्मी समजून पुजा करण्यात येते्.

शहरातील गवळी गल्ली भागातुन सजवलेल्या म्हैस, रेड्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.ही मिरवणूक बालाजी मंदिर, मारुती मंदिर परिसरातून केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मैदानावर गेलीं.या मैदानावर म्हशी व‌ रेड्यांची पळविण्याची स्पर्धा झाली. ही स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांना खूप मोठी गर्दी केली होती.

गवळी समाज व पशुपालकांनी पारंपरिक पद्धतीने म्हैस रेड्यांची पुजा करून पूरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. आशा प्रकारची मिरवणूक अर्धापूर तालुका व परिसरातील गावात फक्त अर्धापूर शहरातच काढण्यात येते.रेड्यांना विविध रंगांनी रंगऊन वर्तमान घडामोडींवर भाष्य करणारे नांव लिहण्यात येतात.तसेच म्हैस, रेड्यांना खास सजवून हि मिरवणूक काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT