जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केली विविध भागांत फिरून पाहणी  
नांदेड

नांदेड : जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः केली विविध भागांत फिरून पाहणी

आरोग्य पथकाच्या वतीने नागरिकांकडे लसीचे दोन डोस घेतले आहेत का?

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (ता. एक) दुपारी स्वतः पथकाला सोबत घेऊन नांदेड शहरातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शहरातील वजिराबाद, हिंगोली गेट, देगलूर नाका, डी मार्ट परिसर तसेच पेट्रोल पंप, ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी अचानक भेटी दिल्या. त्यामुळे अनेकांची धावपळ उडाली. यावेळी सोबत असलेल्या आरोग्य पथकाच्या वतीने नागरिकांकडे लसीचे दोन डोस घेतले आहेत का? याची चौकशी करण्यात येत होती त्याचबरोबर कारवाई देखील करण्यात येत होती. यावेळी महापालिका तसेच पोलिसांचे पथकही सोबत होते.

महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये व संभाव्य विषाणुच्या प्रसाराबाबत ज्या काही धोक्याच्या सूचना येत आहेत त्यातून जिल्ह्याला सावरण्यासाठी लसीकरण आणि कोविड रोखण्यासाठी निर्धारीत केलेले प्रत्येकाचे वर्तन यावर अधिक भर दिला जाईल, असे डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

SCROLL FOR NEXT