कोरोना रूग्ण
कोरोना रूग्ण Esakal
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सामान्य; १२७ अहवाल बाधित

सकाळ वृत्तसेवा

नांदेड, ता.६ (बातमीदार) ः जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू सामान्य होताना दिसत आहे. रविवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या एक हजार ६०१ अहवालापैकी १२७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २९१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले तर, गंभीर रुग्णांपैकी दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ४७३ एवढी झाली असून यातील ९८ हजार १५२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील ७५ वर्षीय पुरुष व परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील ८२ पुरुष अशा दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६८३ झाली आहे.

आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका हद्दीत ६२, नांदेड ग्रामीण दोन, लोहा एक, बिलोली नऊ, कंधार चार, मुदखेड चार, हदगाव तीन, मुखेड आठ, नायगाव दोन, देगलूर तीन, किनवट १३, भोकर तीन, हिमायतनगर तीन, हिंगोली एक, परभणी पाच, औरंगाबाद एक, तेलंगणा एक असे एकूण १२७ बाधित आढळले आहेत.

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ३०, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ६७४, नांदेड महापालिका गृहविलगीकरणात ८९९, देगलूर तीन, खासगी रुग्णालयातील ३२ असे एकूण एक हजार ६३८ व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यापैकी चार बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण बाधित : एक लाख दोन हजार ४७३

  • एकूण बरे : ९८ हजार १५२

  • एकूण मृत्यू : दोन हजार ६८३

  • रविवारी बाधित : १२७

  • रविवारी मृत्यू : दोन

  • रविवारी बरे : २९१

  • उपचार सुरु : एक हजार ६३८

  • गंभीर रुग्ण : चार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT