File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात आरोग्यरक्षक मुखफवाऱ्यांचे बाजारात पेव

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनाच्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी वाफ, गरम पाण्याचे विविध प्रकारच्या काढ्यांचे सेवन आदींच्या प्रचारानंतर आता नाक आणि तोंडामध्ये फवाऱ्यांद्वारे सेवन करता येणारी औषधे बाजारात दाखल झाली आहेत. पण यात तथ्य नसून नागरिकांनी अशा दाव्यांना बळी पडू नये असा सावधगिरीचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रसार प्रामुख्याने नाक आणि तोंडाद्वारे होऊन शरीरात फुफ्फुसापर्यंत होतो. शरीरात यांचा शिरकाव होण्याआधीच प्रतिबंध करण्यासाठी नाकात औषधी फवारे मारावेत. या औषधांमुळे नैसर्गिकरित्या विषाणूंना अटकाव केला जाईल, असा दावादेखील संबंधित कंपन्यांनी केला आहे. जंतूंचा झटपट नाश करण्यासाठी आयुर्वेदिक फवारे (स्प्रे) बाजारात आले आहेत. त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी म्हणूनही विविध जीवनसत्वाचा समावेश असल्याचा दावाही करण्यात आलेला आहे.

विषाणुंना फारसे वजन नसल्याने ते अन्य माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. ते जेव्हा शरीरात प्रवेश करतात तेव्हा काही नाक किंवा घशाच्या मागील भागावर स्थिरावले तर काही अन्ननलिकेतून शरीरात जातात. त्यामुळे अशाप्रकारे स्प्रे मारल्याने संसर्गापासून रक्षण होईल यात तथ्य नाही. अशी उत्पादने बाजारात आणण्यापूर्वी यांच्या चाचण्या झाल्या आहेत का? त्यातील निष्कर्ष काय होते? या बाबी तपासणे आवश्यक आहे, असे कान, नाक, घसा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यंत्रांमधूनही जीवनसत्व...
कोरोनाकाळात वातानुकूलीत यंत्रणा (एसी) वापरू नये असे सूचित केले जात असल्याने आता कडुलिंब ‘क’ जीवनसत्व इत्यादींचा वापर केलेल्या फिल्टरचा वापर केल्याचा दावा करत वातानुकुलित यंत्राची जाहिरात केली जात आहे. तसेच प्रदूषित हवेत कोरोनाचा धोका अधिक असल्याने हवेतील पीए २.५ हे घातक घटक दूर करत हवा शुद्ध करण्याचेही संबंधित कंपन्यांनी म्हटले आहे. अर्थात या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे तपासावे लागेल.

‘‘आयुर्वेदानुसार शरीरातील विविध प्रकारचे सात धातू असतात. हे धातू सारत्व म्हणजे श्रेष्ठ होतात तेव्हा रोग प्रतिकारशक्ती वाढते. यातील प्रत्येक धातू सारत्वापर्यंत पोहोचण्यासाठी किमान सात दिवसांचा कालावधी लागतो. शरीरात नैसर्गिकरित्या ही शक्ती वाढविण्यासाठी किमान ५० दिवस लागतात. या काळात आहार, व्यायाम यासह अनेक बाबींवर लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे झटपट रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे फायदेशीर नाहीत.
- डॉ. कृष्णा कुंभकर्ण (आयुर्वेदिक तज्ज्ञ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT