Nanded Educational materials for Zilla Parishad schools students
Nanded Educational materials for Zilla Parishad schools students Sakal
नांदेड

नांदेड : आईच्या भारोभार शैक्षणिक साहित्याची तुला

सकाळ वृत्तसेवा

लोहा : आजच्या कलयुगात श्रावणबाळा सारखे माणसे या जगात असल्याची अनुभूती जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या शैक्षणिक साहित्य तुला दान कार्यक्रमावरून समोर आली. शहरातील जिल्हा परिषद शाळेतील राजीव तिडके या शिक्षकाने आपल्या आईच्या ८४ वा वाढदिवसाच्या निमित्ताने मंळवारी रोजी आयोजित कार्यक्रमात शालेय उपयोगी साहित्याची तुला करून ते विद्यार्थ्यांना वाटप केले.

जिल्हा परिषदेच्या शाळेला स्वच्छ, सुरक्षित, हरित व डिजिटल करण्यासाठी प्रचंड मेहनत करणारे सहशिक्षक राजीव तिडके यांनी वाढदिवसा वर होणारा वायफळ व अनाठायी खर्च टाळून स्वतःच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवस तसेच स्वतःच्या मातोश्रींची शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शैक्षणिक साहित्य तुला करून ते सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यामध्ये वह्या, पेन, पुस्तके आदींचा समावेश होता.

सदरील कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, मुख्याध्यापक कवर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भिसे, वाडेवाले, वीरभद्र स्वामी, बी.एस.भांगे, प्रदीप कांबळे, मुख्याध्यापक एच.एन. कवर, सहशिक्षक एस,एन. कागणे, श्री.आर.ए. सोनटक्के, फारुख शेख, एन.आर. गुंडरे, सी.टी. बैस, के.डी. केंद्रे, एस.एस. ताटे, एल.ए.भोसले, पांडूरंग चिखलभोसीकर, शेटे, साहेबराव खंडेलोटे, महेश तिडके आदींसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT