Nanded  esakal
नांदेड

Nanded : हरभऱ्याच्या टाकाऊ कुटारातून रोजगार!

हस्तरा येथील दोन तरुणांनी शक्कल लढवत साधली आर्थिक प्रगती

बंडू माटाळकर

निवघा बाजार : हदगाव तालुक्यातील निवघा बाजार, तळणी परिसरात रब्बी हंगामात हरभरा पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात असतो. हरभरा मळणी यंत्रातून काढणी केल्यानंतर कुटार (भुसा) तयार होते. याच कुटाराचा पशुखाद्यासाठी वापर करून तो परिसरात व विदर्भात विकून हस्तरा येथील दोन तरुणांनी आर्थिक प्रगती साधत नफा मिळविला आहे.

निवघा, तळणी परिसरात शेती मशागत यंत्राने केली जाते. यामुळे या भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत नाही. तसेच परिसरात पशुधनही जास्त प्रमाणात नाही, त्यामुळे येथील शेतकरी हरभऱ्यापासून मिळणारे कुटार उपयोगात न आणता जाळून टाकावा लागत होता. परंतु, अकोला, बुलडाणा, नागपूर, अमरावती, यवतमाळ या भागांत पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. तो भाग डोंगराळ असल्याने त्या भागात चाऱ्याचा प्रश्न नेहमी उद्‍भवतो. तेथील शेतकऱ्यांना विकतचा चारा घेऊन जनावरांना खाऊ घालावा लागतो. हरभऱ्याचे कुटार जनावरांसाठी चांगले असते. हदगाव तालुक्यात हरभरा काढणीनंतर त्या भागातील कुटार खरेदीसाठी व्यापारी दाखल होतात. यावेळी एकरप्रमाणे किंवा कुटाराचा ढीग पाहून किंमत ठरवून तो खरेदी करतात.

नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन हस्तरा (ता. हदगाव) येथील दोन तरुण संदीप वाढोणकर आणि शेख हबीब यांनी शक्कल लढविली. स्वतःच परिसरातील शेतकऱ्यांकडून हरभरा कुटार खरेदी करत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, पोफाळी, दहागाव, तरोडा, कळमुळा, मुळावा, विडूळ, ढाणकी, फुलसावंगी आदी भागांतील शेतकऱ्यांना मागणीनुसार घरपोच नेऊन दिला. यासाठी या दोघांनी वीस ते पंचवीस मजूर कामाला ठेवले आहेत. यातून मजुरांना महिनाभर रोजगार मिळाला, तर एका महिन्यात जवळपास दोन लाख रुपयांची उलाढालही झाली. इच्छाशक्ती प्रबळ असली, की आपोआपच मार्ग सापडतो हाच संदेश या तरुणांनी दिला आहे.

हरभऱ्याच्या कुटाराने गावातच रोजगार मिळाल्याचे समाधान आहे. या व्यवसायामुळे तात्पुरता रोजीरोटीचा प्रश्न मिटला असून, बेरोजगारांनी खचून न जाता संकटकाळात मार्ग काढायला हवा.

- संदीप वाढोणकर, हस्तरा

परिसरातील शेतकऱ्यांकडून हरभरा कुटार खरेदी करून विविध भागांत गरजेनुसार शेतकऱ्यांना घरपोच नेऊन दिल्याने आम्हाला फायदा जास्त झाला. कुटाराची मागणीही वाढली.

- शेख हबीब, हस्तरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT