Nanded farmers eleven and half thousand of gram not sold
Nanded farmers eleven and half thousand of gram not sold sakal
नांदेड

नांदेड : साडेअकरा हजार शेतकऱ्यांचा हरभरा शिल्लक

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून जिल्हा मार्केटींग फेडरेशन, विदर्भ को - ऑपरेटीव्ह फेडरेशन व महाएफपीसीच्या ५२ खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी सुरु होती. या ठिकाणी विक्रीपूर्व नोंदणी केलेले ११ हजार ४९६ शेतकरी अद्याप हरभरा विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. हरभरा खरेदी केंद्र शासनाने मुदतीपूर्वीच बंद केल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार पाच हजार २३० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. यासाठी नाफेडने जिल्हा मार्केटींग फेडरेशन, विदर्भ को - ऑपरेटीव्ह फेडरेशन व महाफार्फर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड अशा तीन एजन्सींना नेमून एकूण ५२ खरेदी केंद्रावर ता. १७ मे पर्यंत ३९ हजार ३६१ शेतकऱ्यांनी हरभरासाठी विक्रीपूर्व नोंदणी केली. जिल्ह्यात ता. एक मार्चपासून खरेदीला सुरुवात झाली. आजपर्यंत ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपेकी २७ हजार ८६५ शेतकऱ्यांचा पाच लाख ४७ हजार १३८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

खरेदीची अंतिम मुदत ता. २९ मे पर्यंत असल्याचे कळविण्यात आले होते. परंतु मागील पाच दिवसापासून लॉट इंट्रीचे इ-समृध्दी हे पोर्टल बंद केले आहे. परिणामी, सर्वच खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी बंद झाली आहे. अनेक खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी करुन तो माल शासकीय वेअर हॉऊसला पाठविण्यात आला. परंतू लॉट इंट्री करण्याचे काम राहिल्याने खरेदीदार अडचणीत आले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम तोंडावर आहे. शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना शेतमाल घरात पडून राहिला आहे. शासनाने हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ देवून शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

हरभरा खरेदीचा हंगाम शेवटच्या टप्यात होता. अशावेळी नाफेडकडून खरेदी कोटा पूर्ण झाल्याचे सांगून अचानक पोर्टल बंद केले आहे. त्यामुळे खरेदी बंद झाली आहे. परंतु शिल्लक शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होईल, अशी आशा आहे.

- एस. एस. पाटील, जिल्हा पणन अधिकारी, नांदेड.

हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. परंतु विक्रीपूर्वीच खरेदी केंद्र बंद झाल्याचे कळाल्याने हरभरा घरात पडून आहे. शासनाने लवकर खरेदी प्रक्रिया सुरु करावी.

- मारोती हंबर्डे, शेतकरी, वाका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT