Nanded For the road Seven hundred crores Provision Ashok Chavan  
नांदेड

नांदेडला रस्त्यासाठी सातशे कोटींची तरतूद

पालकमंत्री अशोक चव्हाण; कौठ्यात प्रशासकीय संकुल होणार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रशासकीय कामासाठी जे एकत्रित संकुल अत्यावश्यक आहे, त्याचेही नियोजन केले आहे. कौठा येथील सुमारे शंभर एकर जागेवर हे संपूर्ण प्रशासकीय संकुल एकाच भागात आकारास येणार असल्याने नागरिकांनाही आता ते अधिक सोयीचे होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. त्याचबरोबर नांदेड शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुमारे सातशे कोटी निधीची तरतूद केली आहे. हे सिमेंटचे रस्ते अधिक गुणवत्तापूर्ण व्हावेत, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड येथे कर्मचाऱ्यासाठी निवासस्थानाच्या संकुलाचे भूमीपूजन व सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. २५) सायंकाळी श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, हणमंत पाटील बेटमोगरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता अविनाश धोंडगे, बसवराज पांढरे आदी उपस्थित होते.

नांदेडहून पुणे येथील वाहतुकीची सुविधा ही अधिकाधिक सुलभ व्हावी, यावरही आमचा भर असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, त्या दृष्टीने नांदेड ते लातूर हा स्वतंत्र शंभर किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी आम्ही आग्रह धरला आहे. हा मार्ग झाल्यास नांदेड येथून जलदगती ट्रेनच्या माध्यमातून अवघ्या एक ते दीड तासात लातूरला पोहचता येईल व लातूरमार्गे अवघ्या सहा ते सात तासात पुण्यापर्यंतचा प्रवास सुलभ होईल. यासाठी खासदार हेमंत पाटील व आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधानांकडे या कामांबाबत आम्ही आग्रह धरु, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्याच्या विकासासाठी बदलत्या नैसर्गिक संसाधनांचा विचार करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. जायकवाडीसारख्या मोठ्या धरणाची उपयोगीता धरणाच्या खालच्या बाजूला आता कमी होत चालली आहे. ही उपयोगिता ५० टक्केही राहिलेली नाही. धरणाच्या वरच्या भागात म्हणजेच कॅचमेंट एरियामध्ये पाण्याचे स्रोत जर भक्कम राहिले तरच त्याची उपयोगिता ही खालच्या भागात जाईल. विकासाच्या या परिभाषेकडे आम्ही स्वच्छ दृष्टीने पाहत असून यात कोणतेही राजकारण न ठेवता केवळ सर्वंकश समतोल विकास कसा होईल, याला आम्ही प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT