Nanded gram shopping center Follow up MP Chikhlikar assurance sakal
नांदेड

नांदेड : हरभरा खरेदी केंद्रासाठी पाठपुरावा करू

खासदार चिखलीकर यांचे एफपीओंना आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : किमान हमी दरानुसार सुरू असलेले हरभरा खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या शिष्टमंडळाला दिले.

जिल्ह्यात नाफेडकडून महाएफपीसी पुणे अंतर्गत सुरू असलेल्या हरभरा खरेदी केंद्र शासनाने नुकतेच बंद केले आहे. या बाबत जिल्ह्यातील खरेदी केंद्र चालक शेतकरी उत्पादक संचालकांनी कंपनीच्या शुक्रवारी खासदार चिखलीकर यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी ४१ कंपन्यांचे संचालक उपस्थित होते. हरभरा खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची मुदत २९ मे पर्यंत असताना अचानक नाफेडने पोर्टल बंद केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी प्रक्रिया बंद झाली आहे.

सध्या हजारो शेतकऱ्यांकडे हरभरा शिल्लक असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. याबाबत खासदार चिखलीकर यांना माहिती देऊन केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानंतर खासदार चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे ओएसडी मनोज शिंदे यांच्याशी संपर्क करून जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यासंदर्भात मंत्रीमहोदयांना अवगत करण्याची सूचना केली.

यासोबतच लगेच त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना निवेदन सादर केले. तसेच हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करून लवकरच जिल्ह्यातील केंद्र सुरू होतील असे आश्वासन दिले. खासदार चिखलीकर यांच्या आश्वासनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरेदी केंद्र सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

SCROLL FOR NEXT