Nanded has to face load shedding msedcl
Nanded has to face load shedding msedcl sakal
नांदेड

नांदेडकरांना लोडशेडींगचा करावा लागतोय सामना

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महावितरणच्या नांदेड विभागाच्या वतीने वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना यश येत असून, शुक्रवारी (ता.१५) सकाळी सात वाजेनंतर राज्यात व विभागात कोणत्याही ठिकाणी महावितरणने विजेचे भारनियमन केले जात नाही. असा दावा करण्यात आला होता. मात्र महावितरण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्यात फारसे तथ्य दिसून आले नाही.

शहरातील अनेक मुख्य रस्त्यावरील खांबावरील लाईटात कमी दाबाने वीज सोडली जात असल्याची स्थिती आहे. शनिवारी (ता.१६) शासकीय विश्रामगृह ते गणेश नगर रोडवरील खांबांवरचे लाईट अगदी काजव्या प्रमाणे चमकत होते. त्यामुळे रस्त्यावर लाईट आहे की नाही, असा अनेकांना भास होत होता. दुसरीकडे रविवारी तरोडा भागात देखील सकाळी आठ ते दहाच्या सुमारास जवळपास दोन तासाची लोड शेडींग करण्यात आली होती. त्यामुळे महावितरण विभागाकडून लोडशेडींग पासून मुक्ती असल्याचा दावा फोल ठरताना दिसून येत आहे.

खरे म्हणजे महाराष्ट्रासह देशातील दहा राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई आहे हे नाकारुन चालणार नाही. परंतु महावितरणकडून करण्यात आलेल्या वेगवान प्रयत्नांमुळे अतिरिक्त स्वरुपात वीज उपलब्ध झाली आहे. तसेच खुल्या बाजारामधून (पॉवर एक्सचेंज) २००० मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील व पर्यायाणे नांदेड विभागातील वीजपुरवठ्यात सुधारणा होईल व शहर खरोखरच लोडशेडींगमुक्त व्हावे ही अनेक ग्राहकांची अपेक्षा आहे त्यावर महावितरण विभाग किती खरा उतरतोय हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT