MLA Madhavrao Jawalgaonkar office Theft 
नांदेड

नांदेड : आमदार जवळगावकरांच्या कार्यालयात चोरी

हिमायतनगर मतदारसंघाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हदगाव शहरातील चोरी

सकाळ वृत्तसेवा

हदगाव : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यासह शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरी दरोड्याच्या अनेक घटना ताज्या असतांनाच शनिवारी (ता.२०) रोजीच्या रात्री हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हदगाव शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील कदम नगर येथे असलेल्या पक्ष कार्यालयात सीसीटीव्हीची नासधूस व दिव्यांगांसाठी वाटप करण्यात येणारे काही मोबाईलवर डल्ला मारला आहे.

आज सकाळी रविवारी (ता.२१) रोजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पक्ष कार्यालयात नेहमीप्रमाणे तिथे असलेले सेवक कार्यालयात आले व तिथे येताच त्यांच्या नजरेत पक्ष कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व ईतर साहीत्य इतरत्र पडले असल्याचे दिसून येताच त्यांनी आरडाओरडा केला व ही घटना वाऱ्यासारखी पसरली.

ताबडतोब पोलिसांनी धाव घेतली व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले व चौकशीसाठी सेवक यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. पोलिसांच्या चौकशी दरम्यान सेवकांनी दिव्यांगांसाठी वाटप करण्यात येणारे मोबाईल पैकी तीन मोबाईल गेल्याचे सांगितले.

आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पक्ष कार्यालयात चोर आले होते आणि त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधुस केली असल्याने हा प्रकार उघडकीस आला खरा मात्र चोरांचा मोठी चोरी करण्याचा कट फसला असेच म्हणावे लागेल अशी चर्चा होत आहे. अंतिम सत्य उघड करण्यासाठी पोलिस कसून चौकशी करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत अद्याप कुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयां ऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

Mohammed Siraj: सिराज माझ्यावर प्रचंड रागावला होता...! अजिंक्य रहाणेकडून मोठी कबुली; नेमकं काय झालेलं?

सेटवर सगळ्यांसोबत कशी वागते तेजश्री प्रधान? मालिकेतील भावाने सांगितला अनुभव; म्हणाला- अशी गोड दिसते पण ती खूप...

Ladki Bahin Yojana : पुरुष 'लाडकी बहीण' कसे बनले? २६ लाख अपात्र असलेल्यांचे अर्ज मंजूर कसे झाले? वाचा नेमका कुठं घोळ झाला

Pension Dispute Assault : पेन्शनचे पैसे न दिल्याने पोरानं काठीने आईला केली मारहाण, पत्नी आडवण्यास गेली अन्

SCROLL FOR NEXT