आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन 
नांदेड

नांदेड : आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती दाखविण्याऐवजी विनाकारण कमी करण्याची कारवाई केली

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना काळात शासकीय कोविड सेंटरमध्ये काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना कुठलीही पूर्व सुचना न देता विनाकारण कामावरुन काढून टाकल्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करीत शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु केले.

या आंदोलनात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती दाखविण्याऐवजी विनाकारण कमी करण्याची कारवाई केली असल्याचा आरोप करीत त्यांच्या व मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. कोविड- १९ चा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यातील मृत्यू दर वाढ ही देशात लक्षवेधी ठरली होती. तेव्हा परिचारीका, वार्डबॉय, डॉक्टर, लॕब टेक्निशियन, डीईओ, फार्माशिस्ट व इतर कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरुपात आरोग्य विभागात सामावून घेतले होते. त्यांना तीन महिन्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु कोरानाचा प्रादुर्भाव कमी होताच सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतला असून कर्मचाऱ्यांचे वेतन देखील थकीत आहे.

हेही वाचा - कोविशील्डच्या दोन डोसमध्ये कमीतकमी ८४ दिवस (१२ आठवडे) अंतर असणे बंधनकारक आहे.

तसेच इतर खासगी दवाखान्यात या आरोग्य कर्मचाऱ्यांना काम न देण्याची भूमिका काही खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाने घेतली असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या सोबत शिष्ठमंडळाची बैठक झाली असून स्थानिक मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होते. परंतु जिल्हा प्रशासनाने लेखी पत्र दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही व चालूच राहील अशी भूमिका काही आंदोलकांनी घेतली असल्यामुळे तुर्तासतरी आंदोलन चालूच राहील अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना किमान व समान वेतन लागू करावे. बोगस कारभार करणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई करावी. खाजगी रुग्णालयातील सर्व कामगार कर्मचाऱ्यांना पीएफ लागू करावा या प्रमुख मागण्यासह इतर मागण्याही निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आल्या आहेत.

येथे क्लिक करा - भाजप आणि काँग्रेस यांनी पराभवाची कारणमीमांसा पक्षीय पातळीवर चालवली आहे. पुढील वर्षातील निवडणुका समोर ठेवून भाजप स्थानिक भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या विचारात आहे

या आंदोलनात कॉ. अंकुश माचेवाड, आदी बनसोडे, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, मनिषा भवरे, वैशाली वायदळे, स्वप्नाली जोंधळे, सुरेखा वैद्य आदिंनी परिश्रम घेतले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनीही आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT