Jayant Patil  sakal
नांदेड

नांदेड : जयंत पाटील यांची अतिवृष्टी भागाला भेट

अतिवृष्टीमुळे नांदेडसह राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अतिवृष्टीमुळे नांदेडसह राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. नांदेड जिल्हा, वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. शेतीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना प्रशासनाने, सरकारने या संदर्भात तत्काळ पावले उचलून मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

नांदेडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी नांदेड तालुक्यातील निळा, आलेगाव, एकदरा या गावाची पाहणी केली. त्यावेळी ते गुरुवारी (ता.१४) बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरिहराव भोसीकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मोहम्मद खान पठाण, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, राष्ट्रवादी युवकचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, महानगर युवकचे शहराध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्यासह पदाधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी पाटील म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी गावात शिरले. संपुर्ण गावाला पाण्याने वेढा घातला असून ऊस, सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तत्काळ लक्ष घालून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा तसेच घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तुंची व्यवस्था करावी, अशी मागणी पाटील यांनी करून पुरस्थितीचे संकट राज्यात लक्षात घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मंत्रीमंडळाचा विस्तार करून लोकांना तत्काळ मदतकार्य सुरू करावे, अशीही त्यांनी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT