Nanded local body election Zilla Parishad election sakal
नांदेड

नांदेड : इच्छुकांचे स्वप्न पुन्हा लांबणीवर पडणार !

जिल्हा परिषद निवडणूक; संभाव्य उमेदवारांच्या पदरी पुन्हा निराशा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्हा परिषदेत नव्याने दहा सर्कलची रचना करण्यात आली. त्यामुळे अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली. मात्र, निवडणुका कुठेच दृष्टीक्षेपात दिसत नसल्याने अनेकांनी तुर्तास ‘पॉझ’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेमुळे जिल्हापरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

नांदेड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६३ वरून आता ७३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रस्तावित आरक्षणामुळे अनेकांवर घरी बसण्याची वेळ आली होती. मात्र, वाढलेल्या सर्कल संख्येमुळे अनेकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत आणि ही मंडळी सक्रिय झाली होती. प्रभागरचनेवरील आक्षेपांची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर होतील, अशी परिस्थिती असताना मागील काही दिवसांपासून राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे निवडणुकीचा मुद्दा जरा बाजूला पडला आहे. त्यामुळे नव्यांसह अनेक जुन्हा सदस्यांची निराशा झाली आहे.

सर्कलमधून काढता पाय

संभाव्य निवडणुका पाहता अनेकांनी सर्कलमध्ये खर्च सुरु केला होता. मात्र, तुर्तास निवडणुकीसंदर्भात कुठलाही मोठा निर्णय होण्याची शक्यता दिसत नसल्याने अनेकांनी सर्कलमधून काढता पाय घेतला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

प्रशासकराज नको रे बाबा....

कार्यकाळ पूर्ण झाल्याने जिल्हा परिषदेत प्रशासकराज लावण्यात आले आहे. सुरुवातीला पदाधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसत होता. मात्र, जिल्हा परिषदेत पदाधिकारीच नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना मुख्यालयी पाठविण्यात आले आहे. त्यामुळेच आता कर्मचारी सुद्धा नव्या निवडणुकीची प्रतीक्षा करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: आमचे ऑपरेशन 3.0 सुरू... आता महाभुकंप होणार ; संजय शिरसाटांचा मोठा दावा

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

SCROLL FOR NEXT