file photo 
नांदेड

नांदेड : ढगाळ वातावरणामुळे तूर पिकांचे नुकसान, ढगाळ वातावरणाबरोबर बुरशीजन्य आजाराची लागण

साजीद खान

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : मागील चार- पाच दिवसांपासून माहूर तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने तूर पिकावर अळींचा प्रादुर्भावात वाढ होऊन नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच मातीतून तयार होणाऱ्या बुरशीजन्य रोगामुळे अनेक शेतात तुर पिके उधळल्याने सोयाबीन कापसानंतर तूर ही हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

माहूर तालुक्यातील चारही महसूल मंडळात ढगाळ वातावरणामुळे तूर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मातीतून तयार होणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या आक्रमणामुळे तुरीवर मर रोग आल्याने तुरीचे पीक धोक्यात आले आहे.सोयाबीन पीक काढणीच्या वेळी सतत पाऊस झाला त्यामुळे शेतातील कापूस व सोयाबीन गंजी मारून ठेवलेले पिक जागेवरच खराब झाले. बोंडसड, बोंड अळीमुळे कापसाचा ही उतारा कमी आला. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी तूर पिकातून तोटा भरून काढतील या आशेवर जगत होते.परंतु मागील चार पाच दिवसापासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर आळी चा मारा होत आहे. व विविध रोग पसरत आहेत. वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकांचे मोठे नुकसान होत असताना त्यावर उपाययोजना म्हणून शेतकरी वेगवेगळ्या महागड्या औषधी फवारणी करताहेत परंतु फवारणी करून सुद्धा इतर रोगावर कोणताही परिणाम होत नसल्याची ओरड शेतकरी करत आहे.

ढगाळ वातावरणामुळे हरभरा तूर या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे फवारणीसाठी महागडी कीटकनाशके खरेदी करण्यास पैशाअभावी पुन्हा अडचण येणार आहे. खरीप हंगामातील जास्त पावसाने सर्वच पिकांवर परिणाम झाला. सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली पण अद्याप मिळाली नाही. खरीप पिकां बरोबर रब्बी पिक ही धोका देत असल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे.

ज्यादा नफ्यासाठी शेतकऱ्यांनी अल्प मुद्दतीच्या पिकांचा अवलंब केल्याने जमीनीची व्हावी तशी धूप होत नाही.परिणामी मातीमध्ये बुरशी वाढत आहे. बुरशी रोगाचा समुळ नायनाट करण्याकरीता उन्हाळी मशागत करते वेळी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून ते मातीमध्ये सोडणे आवश्यक आहे.

- कैलाश बेहेरे, शेतकरी,वाई बाजार ता.माहूर

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : कोयना परिसरात भूकंपाचा धक्का !

SCROLL FOR NEXT