TDM movie director bhaurao karhade talks on marathi audience
TDM movie director bhaurao karhade talks on marathi audience  sakal
नांदेड

TDM : मी पुन्हा येतोय ! दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे 'टीडीएम’ च्या प्रमोशनसाठी नांदेडमध्ये; व्यक्त केली खंत

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा जागर होत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांचीच गळचेपी केली जात आहे, हे मराठी लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांचे दुर्दैव आहे, अशी खंत ‘टीडीएम’ मराठी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते भाऊराव नानासाहेब कऱहाडे यांनी व्यक्त केली.

‘टीडीएम’ चित्रपट येत्या ता. नऊ जून रोजी महाराष्ट्र पुर्नप्रदर्शीत होत असून, त्याच्या प्रमोशनसाठी ते नांदेडला आले असता त्यांनी मंगळवारी (ता. सहा) पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी चित्रपटातील मुख्य नायक पृथ्वीराज थोरात, नायिका कालींदी निस्ताने आणि मुळचे घुंगराळा (जि. नांदेड) येथील कलाकार प्रभाकर मठपती उपस्थित होते. श्री. कऱ्हाडे म्हणाले की, ‘टीडीएम’ हा सिनेमा २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता.

त्यात दोन नव्या चेहऱ्यांना मोठ्या पडद्यावर आणले आहे. शिवाय चित्रपटाचाही विषय वेगळ्या धाटणीचा असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होता. मात्र, प्राईम टाईम नसल्याने, अनेक ठिकाणी शो नसल्याने हा चित्रपट चित्रपटगृहातून काढला होता. आता पुन्हा येत्या नऊ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटापूर्वी माझे ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ हे चित्रपट प्रदर्शित झाले असून, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य नायिका निस्ताने म्हणाली की, मी विदर्भातील वर्धा येथील आहे. पृथ्वीराज आणि मी दोघेही नवीन असताना साधारण मध्यमवर्गीय मुला-मुलीला नायक आणि नायिका करून आमचे चित्रपटात काम करण्याचे स्वप्न कऱ्हाडे यांनी साकार केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT