Nanded Mahur Water supply through wells
Nanded Mahur Water supply through wells sakal
नांदेड

नांदेड : विहिरीतील गाळ उपसा करून पाणी उपलब्ध करावे

सकाळ वृत्तसेवा

माहूर : माहूर शहरातील वार्ड क्रमांक एकमधील साई रेणुका पार्कमध्ये ओपन स्पेसमध्ये असलेल्या पुरातनकालीन विहीरीतील गाळ काढून नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीचे निवेदन नगरसेवक प्रा. विलास भंडारे, कॉँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल माडपेलीवार, तालुका कॉँग्रेस प्रवक्ते जयकुमार अडकीने यांनी मुख्याधिकारी किशोर यादव यांना दिले आहे.

सदर विहिरीत भरपूर प्रमाणात पाणी असून आज रोजी त्या विहिरीतील झरे अविरत सुरु आहेत. विहिरीत पाण्याचा अनेक वर्षापासून उपसा झालेला नसल्याने सदर विहिरीत गाळ साचलेला आहे. त्यामुळे पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. तसेच वार्ड क्रमांक एकमधील साई रेणुका पार्कमध्ये पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन झाली नाही.

शहरात इतर भागात पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा होत असताना वार्ड क्रमांक एकमध्ये साई रेणुका पार्कमधील नागरिकांना या सुविधेपासून वंचित राहवे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सदर परिसरात उपलब्ध असलेल्या साई रेणुका पार्कमधील ओपन स्पेसमधील विहिरीतील गाळ काढल्यास परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक समस्या दूर होईल. तसेच पाणीपुरवठ्याचीही समस्या मिटू शकेल तसेच सदरील काम हे पावसाळा सुरु होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी विहिरीच्या बाजूला असलेली झाडे झुडपे काढून विहीर मोकळी करून त्यातील गाळ उपसा करून वार्डातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देऊन आरोग्यविषयक अडचण व पाणी टंचाईची अडचण दूर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर नगरसेवक प्रा. भंडारे, कॉँग्रेस शहर उपाध्यक्ष माडपेलीवार, प्रवक्ते अडकीने, संदीप काण्णव, भोजराज पाटील, रमेश जाधव, सुधाकर चेवटे, विजय घाटे, विनायकराव काण्णव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT