Nanded Mandvi bad road construction undevelop tribal areas sakal
नांदेड

नांदेड : आदिवासीबहुल भागात रस्त्यांची अवकळा

लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे मांडवी परिसरातील रस्त्यांची झाली ‘बकाल’ अवस्था

माधव शेंद्रे

मांडवी : किनवट तालुका हा आदिवासी व बंजारा बहुल असल्यामुळे इतर तालुक्यापेक्षा अधिकचा विकास निधी येतो परंतु जिल्ह्यापासून दोनशे किलोमीटर अंतरवर असलेला मांडवी परिसर असून लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा व टक्केवारीमध्ये अडकलेले गुत्तेदार यांच्या मिलीभगतमध्ये आदिवासीबहुल परिसरातील रस्त्याची पुरती वाट लागली आहे.

तेलंगणा व विदर्भातून राज्यमार्ग क्रमांक २६७ जात असून दरवर्षी त्याची डागडुजी केली जाते. परंतु दर्जाहीन कामामुळे खड्ड्यांची परिस्थिती कायम आहे. मांडवी वरून आदीलाबाद व किनवट जाणाऱ्या रस्त्याचे काम एक एक किलोमिटर वगळून काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. परंतु राहिलेल्या रस्त्यावर परंपरागत खड्डे कायमच आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तलाईगुडा ते तेलंगणा सीमेपर्यंत एक महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या बांबूच्या पुलावरील स्लॅब दबल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्या मुळे अपघाताची मालिका सुरू आहे.

यवतमाळ व्हाया नागपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर लिंगी फाट्या जवळ प्रचंड मोठा खड्डा पडला असून त्यामुळे अनेक वाहने पलटी होत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक प्रभावित होऊन बंद होणार आहे. मांडवी बाजारपेठेचे गाव असून ३८ गाव, वाडी व तांड्याचे महिला पुरुष खरेदी विक्रीसाठी येथे येत असतात. महामंडळाच्या बसेस नसल्यामुळे ऑटो व टेम्पोनेच ये-जा करावी लागते कारण आरामदायक व आधुनिक प्रवासी वाहने या मार्गावर चालविण्यासाठी कोणीही धजावत नाही.

कणकी फाटा ते डोंगरगाव व पिंपळगाव ते जरूर, जरूर खेडी हा रस्ता पूर्णतःउखडला असून कणकी ते कोठारी (सी.) या रस्त्यावरील खड्यामुळे वाहतुकच बंद झाली आहे. मांडवी ते शिरपूर, जमुनानगर, कोठारी तांडा हा रस्ताही खडेमय झाला आहे. तर सिंगोडा, पाटोदा(बु), व खांबाळा, दुर्गापेठ, सकृनाईक तांडा, पार्डी हा रस्ता हा डांबरीकरण असलेला रस्ता सध्या खडीकरण बनला आहे. राज्यपाल दत्तक गाव जवरला ते किनवट हा दोन वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यावर अनेक जागी दरड कोसळली असून पक्के बांधकाम केलेल्या नाल्या पूर्णपणे बुजल्या आहेत.

मांडवी परिसराचे दुर्भाग्यच

माजी खासदार उत्तमराव राठोड यांचा वारसा लाभलेल्या मांडवी परिसराचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल की आज घडीला या परिसरातील खेडेपाड्यांना जोडणारा एकही रस्ता चांगला नाही. प्रसूती पूर्व गर्भवती मातेला येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचवत असताना खड्डे युक्त रस्त्यामुळे कधी काय घडेल याची भीती रुग्णाच्या कुटुंबीयांना राहते. सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्याचे संपूर्ण कंत्राट लोकप्रतिनिधी सोबत वावरणाऱ्या मर्जीतीलच कार्यकर्ते गुत्तेदारांना दिल्या जाते. मग या रस्त्यांची कामे कितीही थातूरमातूर होऊ दे पाठीराखे लोकप्रतिनिधी संबंधित विभागाच्या अभियंत्याला सुरुवातीलाच दम देतात की ‘बिल थांबायला नको’ आमका गुत्तेदार माझा कार्यकर्ता आहे. या वृत्तीमुळे सुमार दर्जाची रस्ते बांधकाम व दुरुस्ती झाल्याने या विभागातील रस्त्यांचा मागासलेपणा कसा दूर होईल हा यक्ष प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.

तालुक्यातील रस्त्याच्या कामात टक्केवारीचा रोग लागल्यामुळे नित्कृष्ट दर्जाची कामे होत आहेत. त्यामुळे दोन ते तीन महिन्यातच रस्ते उखडून जात असून शासनाचा पैसा पाण्यात जात आहे. एक वर्षा नंतर त्याच रस्त्यावर पुन्हा काम केले जात आहेत.

- संध्या प्रफुल राठोड, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य

शासन विकासासाठी निधी देत आहे, परंतु स्थानिक गुत्तेदार त्याचा योग्य उपयोग करीत नसून टक्केवारी मुळे कुणाचेही कुणावर नियंत्रण राहिले नाही.

- नवीन राठीड, उपाध्यक्ष, काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश

परिसरातील कामात टक्केवारीचा धंदा सुरू आहे. परंतु टेंडर भरते वेळेस सर्व गुत्तेदार रिंग पद्धतीचा अवलंब करून एकमेकांना कामे सोडून घेत आहेत. त्यामुळे नित्कृष्ट दर्जाची कामे होत आहे.

- मधुकर राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य

कामातील टक्केवारीत सर्व गुंतले असून आमच्या सारख्या कार्यकर्त्याने तक्रार केली तरी योग्य ती कार्यवाही न करता थातूर मातूर कार्यवाही करून दोषींना वाचविले जाते.

- मधुकर शेंडे, तालुका प्रमुख प्रहार जनशक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT