Nanded
Nanded sakal
नांदेड

Nanded : आमदार अंतापूरकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा

मागण्यांचे निवेदन सादर, देगलूर - बिलोली मतदारसंघातील प्रश्नाबाबत चर्चा

देगलूर : देगलूर बिलोली मतदारसंघातील विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार जितेश अंतापुरकर यांनी त्यांना साकडे घातले. यावेळी त्यांनी निवेदन सादर करून मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली.

देगलूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान आठशे मिलीमीटर असून सप्टेंबरच्या पूर्वीच पावसाने सरासरी ओलांडलेली आहे. तालुक्यात दोन ते तीन वेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा खरडून गेल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

मात्र, प्रशासनाने ४० ते ६० टक्केच नुकसान झाल्याच्या अहवाल दिल्याने शेतकऱ्यांना दुष्काळापोटी मिळणाऱ्या रक्कमेतही मोठी घट झाली आहे. दसऱ्याच्या तोंडावर मिळणारी ही रक्कम दिवाळीच्या तोंडावर सुद्धा मिळायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यात संताप व्यक्त केला जात असल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

शेतातील नुकसान उंबरठा उत्पन्नाच्या कितीतरी पटीने अधिक झालेले असतानाही पिक विमा कंपनीने अद्याप कोणताच निर्णय शेतकऱ्यांना कळवला नसल्याने ती रक्कमही शेतकऱ्यांच्या हातात किती पडेल? याबाबतही शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे.

तालुक्यातील शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी अनेक शिक्षक संघटना व सामाजिक संघटनांनी केल्यामुळे याकडेही मुख्यमंत्र्यांनी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर हा निर्णय मागे घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही आमदार जितेश अंतापुरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या सर्व मागण्यांच्या वर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक होकार दर्शविला असून देगलूर बिलोली मतदारसंघातील रखडलेल्या विविध प्रश्नाबाबतही त्यांनी येणाऱ्या काळात ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार अंतापूरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT