police
police sakal
नांदेड

Nanded : चोरीला गेलेले ८० मोबाइल मिळाले परत

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहर आणि जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून आणि बाजारातून हरवलेले, गहाळ आणि चोरी झालेले तब्बल १२ लाख ८२ हजार नऊशे रुपयांचे ८० मोबाईल सायबर शाखेने हस्तगत केले. त्यानंतर त्याची शहानिशा करून संबंधितांना ते मोबाईल पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहेत.

शहर आणि जिल्ह्यात आठवडी बाजार, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणाहून महागडे मोबाईल गहाळ, हरवले तसेच चोरी होत आहेत. त्यामुळे या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांना आदेशित केले होते. त्यानुसार सायबर सेलचे एक पथक आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे पथक तयार करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याची मोहिम राबविण्यात आली होती.

या पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशा मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन घेतला आणि ८० मोबाईल हस्तगत केले

आहेत.

त्या मोबाईलचे एकत्रिरित्या वाटप करण्यात आले. तसेच ज्यांचे मोबाईल हरवले आहेत त्यांनी मोबाईलचे आयएमइआय क्रमांकाची खात्री करून घेऊन जाण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

सदरील कार्यवाही पोलिस अधीक्षक कोकाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डॉ. खंडेराय धरणे, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, प्रशांत देशपांडे, नानासाहेब उबाळे, फौजदार जी. बी. दळवी, सोपान थोरवे, पोलिस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे, विलास राठोड, रेश्मा पठाण, अनिता नलगोंडे, दाविद पिडगे, दीपक शेवाळे, मोहन स्वामी, किशोर जैस्वाल, काशीनाथ कारखेडे, व्यंकटेश सांगळे, सौरभ सिद्धेवार आदींनी पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT